Home Video रामराज्य स्थापनेसाठी कोल्हापूर जिल्ह्यात २०० हून अधिक ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ संपन्न!

रामराज्य स्थापनेसाठी कोल्हापूर जिल्ह्यात २०० हून अधिक ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ संपन्न!

10 second read
0
0
33

no images were found

रामराज्य स्थापनेसाठी कोल्हापूर जिल्ह्यात २०० हून अधिक ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ संपन्न!

कोल्हापूर: – आज संपूर्ण जग युद्धजन्य परिस्थितीच्या उंबरठ्यावर उभे आहे. इतिहासाचे अवलोकन केल्यास लक्षात येते की, युगानुयुगे ज्या युद्धात मारुतिराय विराजमान झाले, तिथे विजय निश्‍चित झाला आहे! मग ते प्रभू श्रीरामांच्या सैन्यात राहून रावणाच्या लंकेचे दहन करणारे मारुतिराय असोत, वा महाभारतात अर्जुनाच्या रथावर ध्वजस्तंभावर विराजमान होऊन अधर्माविरुद्ध पांडवांना बळ देणारे हनुमान असोत! इतकेच नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ’हिंदवी स्वराज्या’साठी समर्थ रामदास स्वामींनी गावोगावी मारुतीरायांची मंदिरे स्थापून जी बलोपासना सुरू केली, त्यातूनच स्वराज्याला आध्यात्मिक आणि सामर्थ्याचे बळ मिळाले.

आज पुन्हा एकदा देश आणि धर्म संकटात असून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. अशा काळात प्रत्येक हिंदूमध्ये मारुतीरायांसारखे शौर्य, शक्ती आणि भक्ती जागृत व्हावी अन् येणार्‍या भीषण आपत्काळात मारुतीरायांच्या आशीर्वादाने हिंदूंचा विजय सुनिश्‍चित व्हावा, याच संकल्पनेतून श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ८५० पेक्षा अधिक ठिकाणी हा उपक्रम घेण्यात आला. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा आदी राज्यांतील सामूहिक गदापूजनात हजारो युवकांनी सहभाग घेतला. कोल्हापूर जिल्ह्यात २०० हून अधिक ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ करण्यात आले. यात प्रामुख्याने समर्थ रामदासस्वामी यांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी एक असलेले मनपाडळे (पन्हाळा तालुका), तसेच जुने पारगाव येथील हनुमान मंदिरांचा समावेश होता.

 ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’

‘गदापूजन’ विधी, श्री हनुमानाची आरती, मारुति स्तोत्रपठण, शंखनाद आणि सामूहिक प्रार्थना केल्यानंतर ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजप या गदापूजन कार्यक्रमात करण्यात आले. या वेळी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावेत’ याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’ घेण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात गेली ४ वर्ष सामूहिक ‘गदापूजन’ कार्यक्रम यशस्वीपणे घेण्यात येत आहेत आणि यावर्षीही हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक यांचा उत्तम सहभाग यात दिसून आला. शाहुवाडी(मलकापूर) येथील जय हनुमान कुस्ती संकुलातील युवक यांच्यासह जिल्ह्यात विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…