no images were found
अंबा घाट आणि बांधवगड येथील नवीन रिसॉर्ट्ससह क्लब महिंद्राची 159 नवीन खोल्यांची भर
~आर्थिक वर्ष 2026 पर्यंत 1,000 नवीन रूम्स तर आर्थिक वर्ष 2030 पर्यंत 12,000 रूम्सचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे नवीन रिसॉर्ट पूरक आहे~
कोल्हापूर (प्रतिनिधी):-भारतातील अग्रगण्य हॉस्पिटॅलिटी कंपनी, महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेडने (MHRIL) आज महाराष्ट्रातील क्लब महिंद्रा अंबा घाट आणि मध्य प्रदेशातील क्लब महिंद्रा बांधवगड येथे दोन नवीन रिसॉर्ट्स सुरू करण्याची घोषणा केली. यामुळे कंपनीच्या वाढत्या पोर्टफोलिओमध्ये 159 रुम्सची भर पडली असून, यामुळे पश्चिम आणि मध्य भारतातील तिचे अस्तित्व अधिक मजबूत झाले आहे.
कमी-माहितीची ठिकाणे प्रवासाच्या नकाशावर आणून भारतीय पर्यटकांसाठी नवीन पर्यटन स्थळे उपलब्ध करून देण्याच्या क्लब महिंद्राच्या व्यापक धोरणाचे ही रिसॉर्ट्स सुरू करणे म्हणजे प्रतिबिंब आहे. लेझर प्रवासाच्या मजबूत आणि सातत्यपूर्ण मागणीच्या आधारावर, कंपनीने ग्रीनफिल्ड डेव्हलपमेंट्स, व्यवस्थापन करार आणि इतर लवचिक ऑपरेटिंग मॉडेल्सच्या मिश्रणातून आपला पोर्टफोलिओ विस्तारण्यासाठी भांडवल-कार्यक्षम, कमी-मालमत्ता दृष्टिकोन स्वीकारला आहे. आर्थिक वर्ष 30पर्यंत पोर्टफोलिओ 12,000 रूम्सपर्यंत वाढवण्याच्या MHRIL च्या विस्तार धोरणाशी हे सुसंगत आहे.
या शुभारंभावर भाष्य करताना, महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, मनोज भट म्हणाले, “अंबा घाट आणि बांधवगड यांसारखी ठिकाणे आजच्या प्रवाशांमध्ये असलेली निसर्गाची आवड, निसर्गरम्य ठिकाणांच्या इथे राहण्याची पसंती दर्शवतात. सुट्टीसाठी येणाऱ्या कुटुंबांच्या बदलत्या वर्गासाठी उदयोन्मुख पर्यटन स्थळे ओळखण्यावर आणि त्यांचा विचारपूर्वक विकास करण्यावर आमचा नेहमीच भर राहिला आहे. आम्ही भविष्यासाठी तयारी करत असताना, विविध ठिकाणी उच्च-गुणवत्तेच्या सुविधांचा विस्तार करण्यावर आणि त्याच वेळी कुटुंबांना सुट्टीचा अविस्मरणीय अनुभव सातत्याने देण्यावर आमचे लक्ष केंद्रित आहे. हाच दृष्टिकोन आम्हाला भारतातील सर्वात विश्वासार्ह पर्यटन आतिथ्य ब्रँड बनण्याच्या आमच्या प्रवासात मार्गदर्शक ठरतो आहे.”
महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेतील कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील अंबा घाट ही एक निसर्गरम्य पर्वतीय खिंड आहे, जी गर्दीच्या पर्यटन स्थळांपासून दूर निसर्गरम्य ठिकाणी सुट्टी घालवू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी एक शांत डोंगराळ ठिकाण म्हणून हळूहळू लोकप्रिय होते आहे. अंबा घाट रिसॉर्टमध्ये 96 खोल्या असून ती नदीच्या दिशेने असतील. येथून कडवी नदी वाहते, ज्यामुळे पर्यटकांना हिरव्यागार सह्याद्रीच्या निसर्गरम्य परिसरात एक शांत निवासाचा अनुभव मिळेल.
मध्य प्रदेशातील विंध्य पर्वतरांगांमध्ये वसलेले बांधवगड, बांधवगड राष्ट्रीय उद्यानासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. हे उद्यान जगातील प्रमुख वन्यजीव पर्यटन स्थळांपैकी एक असून येथे सर्वाधिक बंगाल वाघ आहेत. 63 खोल्यांचे बांधवगड रिसॉर्ट पाहुण्यांना सभोवतालच्या नैसर्गिक वातावरणाच्या अधिक जवळ आणण्यासाठी डिझाइन केलेले आहे, जिथे प्रशस्त व्हरांडे, बाहेरील डेक आणि जंगल असा एक अविस्मरणीय अनुभव मिळेल.
थोडक्यात, ही ठिकाणे म्हणजे थोड्या हटके ठिकाणी पर्यटनाचा विस्तार करण्यावर ‘क्लब महिंद्रा’ने केलेल्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. अशी ठिकाणे कुटुंबे आणि विरंगुळ्यासाठी प्रवास करणाऱ्या पर्यटकांना निसर्गाचा सखोल अनुभव देतात. अलीकडेच त्यांनी उत्तराखंडमध्ये ‘क्लब महिंद्रा नदिया पराओ’ सुरू केले असून, महाराष्ट्रातील दापोली येथेही एका नवीन मालमत्तेचा करार केला आहे.