Home Uncategorized स्कोडा ऑटो इंडियाची नवीन कुशाक लाँच — “ईजी टू लव्ह” मोहिमेतून मूल्य, कामगिरी आणि सुरक्षिततेची नवी व्याख्या

स्कोडा ऑटो इंडियाची नवीन कुशाक लाँच — “ईजी टू लव्ह” मोहिमेतून मूल्य, कामगिरी आणि सुरक्षिततेची नवी व्याख्या

2 second read
0
0
17

no images were found

स्कोडा ऑटो इंडियाची नवीन कुशाक लाँच — “ईजी टू लव्ह” मोहिमेतून मूल्य, कामगिरी आणि सुरक्षिततेची नवी व्याख्या

 
कोल्हापूर,  : स्कोडा ऑटो इंडिया ने आपल्या लोकप्रिय एस यू व्ही मॉडेल कुशाक चे अद्ययावत व्हर्जन “ईजी टू लव्ह” या नव्या मोहिमेसह लाँच केले असून, किमती जाहीर करत ग्राहकांना डिलिव्हरी सुरू केल्याची घोषणा केली आहे.
यावर्षी जानेवारीमध्ये अनावरण करण्यात आलेली ही नवीन कुशाक मूल्य, सुरक्षितता आणि ड्रायव्हिंग डायनॅमिक्सच्या बाबतीत नवे मापदंड निर्माण करते. युरोपियन तंत्रज्ञान अधिकाधिक ग्राहकांपर्यंत सुलभ करण्याच्या ब्रँडच्या धोरणाला ही गाडी पुढे नेते.
नवीन कुशाकमध्ये पहिल्यांदाच ८-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि रिअर सीट मसाजर यांसारखी अत्याधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. ही एस यू व्ही १.० टी एस आय आणि १.५ टी एस आय अशा दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध असून, मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय ग्राहकांना मिळतात.
ही गाडी क्लासिक प्लस, सिग्नेचर, स्पोर्टलाइन, प्रेस्टीज आणि मोंटे कार्लो अशा पाच ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे. तसेच, कँडी व्हाईट, कार्बन स्टील, ब्रिलियंट सिल्व्हर, लावा ब्लू, डीप ब्लॅक यांसह शिमला ग्रीन, स्टील ग्रे आणि चेरी रेड अशा एकूण आठ आकर्षक रंगांमध्ये ग्राहकांसाठी सादर करण्यात आली आहे.
स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक आशिष गुप्ता यांनी सांगितले की, “युरोपियन तंत्रज्ञान सर्वांसाठी सुलभ करणे हे आमचे ध्येय आहे. नवीन कुशाकद्वारे आम्ही मूल्य, सुरक्षा आणि कामगिरी यांचा उत्तम समतोल साधत आहोत. सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच देण्यात आलेली फीचर्स आणि स्पर्धात्मक किंमतीमुळे ही एस यु व्ही सुरुवातीपासूनच उत्कृष्ट मूल्य प्रदान करते.”
नवीन कुशाक ही ५-स्टार सुरक्षा, उत्कृष्ट ड्रायव्हिंग अनुभव आणि आधुनिक फीचर्ससह भारतीय ग्राहकांसाठी एक आकर्षक पर्याय ठरत आहे.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…