Home Uncategorized सीएसआरमधून कोल्हापूर शहर सौंदर्यीकरणाला संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सीएसआरमधून कोल्हापूर शहर सौंदर्यीकरणाला संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

2 min read
0
0
35

no images were found

सीएसआरमधून कोल्हापूर शहर सौंदर्यीकरणाला संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर,  : कोल्हापूर शहराच्या सौंदर्यीकरणासाठी सीएसआर निधीतून कामे करण्याचे महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी केलेल्या आवाहनाला शहरातील विविध सामाजिक संस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानिमित्ताने महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात आयोजित बैठकीत विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            शहरातील मुख्य चौक आयलंड, फुटपाथ, दुभाजक, सार्वजनिक स्वच्छतागृहे, महापालिकेच्या शाळा व उद्याने विकसित करण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली. ‘कोल्हापूर फर्स्ट’ संस्थेकडून सीएसआर निधीतून चार स्विपिंग मशिन्स व स्वच्छतागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल सुरेश जैन यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

            प्रारंभी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी महापालिकेच्या धोरणाची माहिती देत इच्छुक संस्थांनी संबंधित ठिकाणांसह मागणीपत्र सादर करण्याचे आवाहन केले.

            महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी ‘माझं शहर, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत सामाजिक संस्थांचे सहकार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. त्यामुळे पहिल्यांदा मी अशा संस्थांचे आभार माणते. आजची ही बैठक जे प्राधान्याने काम करण्यास तयार आहेत अशा संस्थांसाठी त्यांच्या मागणी प्रमाणे ठिकाणे महापालिकेच्या नियमानुसार सुशोभिकणासाठी दिली जाणार आहेत. आतापर्यंत 37 प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यापैकी 30 प्रस्तावांना अंतिम मान्यता देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, सर्व संस्थांचा व्हॉट्सअ‍ॅप गट तयार करून कामांचे समन्वय साधला जाणार असलेचे सांगितले.

            या बैठकीत विविध संस्थांनी पुढीलप्रमाणे उपक्रम जाहीर केले :

            यावेळी सुरेश जैन ‘कोल्हापूर फर्स्ट’ संस्थेकडून शहर विकासासाठी सातत्याने सहकार्य करणार असलेचे जाहिर केले. नितीन वाडेकर यांनी इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे शास्त्रीनगर येथील त्रिकोणी उद्यानाचा विकासीत करणार असलेचे जाहिर केले.

            पारस ओसवाल यांच्याकडून यल्लमामंदिर येथील मुख्‍य चौक संविधान चौक विकसित करण्याची घोषणा केली के.पी.खोत यांनी क्रिडाईतर्फे चार चौकांचे सुशोभीकरण व धैर्यप्रासाद हॉल ते गोकुळ कार्यालय या रोडवर आवशक त्या ठिकाणी स्वच्छतागृह देऊ असे सांगितले. तसेच फुलेवाडी येथील चौक ही ओम कन्स्ट्रक्शन स्वत: करुन देणार असलेचे सांगितले. त्याचबरोबर एका फौंडेशनच्या मदतीनी चार शाळाही बांधून देऊ असे सांगितले.

            ब्लीम संस्थेच्या श्रध्दा राठोड यांनी पंचगंगा घाटाची स्वच्छता व नमामी पंचगंगा हा सायंकाळचा आरतीचा कार्यक्रम घेणार असलेचे सांगून संस्थेच्या माध्यमातून घाटावर सुशोभिकरण व आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही देणार असल्याचे सांगितले.

            इनरवील संस्थेच्या सुवर्णा गांधी यांनी एसटीस्टॅन्ड परिसरातील बाळासाहेब देसाई पुतळया समोरील आयलॅन्ड विकसीत करणार असलेचे सांगितले. गार्डन्स, वसुंधरा ग्रुपच्या माध्यमातून शहरामध्ये झाडे कुठे कुठली लावावीत यासाठी मार्गदर्शन करणार असलेचे सांगितले.

            माजी नगरसेविका स्मिता माने यांनी यावेळी बोलताना महापौर सौ.रुपाराणी निकम या कार्यतत्पर महापौर असल्याचे दाखवून दिलेचे सांगून विकासाच्या दृष्टीने काम करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे मी नैवैद्यम हॉटेलच्या माध्यमातून मुक्त सैनिक गार्डन ते संभाजी महाराज पुतळा उद्यानापर्यंत मुख्य दुभाजक सुशोभिकरण करणार असल्याचे सांगितले.

            यानंतर गटनेता मुरलीधर जाधव, नगरसेवक विजयसिंग खाडे, आशकिन आजरेकर, स्वरुप कदम, माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी आली मते मांडली. यानंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विरोधी पक्षनेता राजेश लाटकर यांनी केले.

            यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.कौसर बागवान, गटनेता इंद्रजित बोंद्रे, नगरसेविका सौ.अरुणा गवळी, सौ.अर्चना कोराणे, सौ.जयश्री कांबळे, उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, सहा.आयुक्त स्वाती दुधाने, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर रचनाकार एन एस पाटील, उपशहर अभियंता महादेव फुलारी, निवास पोवार, सुरेश पाटील, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, कनिष्ठ अभियंता अमित दळवी, वृक्षप्रेमी ऑर्गनायजेशनचे अमोल बुढ्ढे, आझाद हिंद नेचर आर्मीचे राहुल मगदूम, रोटरी क्लबचे प्रदिप कारंडे, ब्लुब बाय जय क्लबचे हिना गांधी, कोल्हापूर ब्रँचचे चेअरमन अशिष सेवेकरी, व्हाईस चेअरमन निलेश भालकर व इतर संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…