Home Uncategorized उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडची मुंबई इंडियन्ससोबत टी20 लीग 2026 साठी अधिकृत बँकिंग पार्टनर म्हणून भागीदारी

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडची मुंबई इंडियन्ससोबत टी20 लीग 2026 साठी अधिकृत बँकिंग पार्टनर म्हणून भागीदारी

21 second read
0
0
22

no images were found

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडची मुंबई इंडियन्ससोबत टी20 लीग 2026 साठी अधिकृत बँकिंग पार्टनर म्हणून भागीदारी

खेळाला ताकद अन् देशाचे सक्षमीकरण ……

 मुख्य ठळक मुद्दे:

  • उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकने टी20 लीग 2026 साठी मुंबई इंडियन्ससोबत अधिकृत बँकिंग पार्टनर म्हणून भागीदारी केली
  • उत्कर्ष एसएफबीएल आणि मुंबई इंडियन्सचे वरिष्ठ अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते
  • ही भागीदारी क्रिकेट चाहत्यांमध्ये बँकेची राष्ट्रीय पातळीवरील पोहोच मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा आहे

कोल्हापूर, : उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (उत्कर्ष एसएफबीएल) ची टी-२० २०२६ च्या लीगसाठी ‘मुंबई इंडियन्स’ चे अधिकृत बँकिंग भागीदार म्हणून निवड झाली असून बँकेने या महत्वपुर्ण भागीदारीची घोषणा आज केली. बँकेसाठी हा धोरणात्मक भागीदारीचा अतिशय महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या भागीदारीच्या माध्यमातून बँक आपली राष्ट्रीय स्तरावरील ओळख वाढवण्याबरोबरच देशभरातील कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांशी आपले नाते अधिक दृढ करत आहे.

         सदर घोषणेसाठी आयोजित विशेष कार्यक्रमाला उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोविंद सिंग, मुख्य वित्त अधिकारी श्री. सरजुकुमार प्रवीण सिमारिया आणि कन्झ्युमर बँकिंग प्रमुख श्री. सौरभ घोष तसेच मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

       श्री गोविंद सिंग, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड या ऐतिहासिक भागीदारीबद्दल बोलताना म्हणाले, “मुंबई इंडियन्ससारख्या संघासोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे कारण हा एक असा संघ आहे ज्यांनी कामगिरी, नेतृत्व आणि चाहतावर्गाशी संवाद यात सातत्याने नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत. ही भागीदारी देशभरातील ग्राहकांशी अधिक मजबूत नाते निर्माण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे, तसेच, देशातील या अत्यंत लोकप्रिय क्रीडा व्यासपीठामुळे आमच्या ब्रँडची ओळख जनसामान्यात अधिक मजबूत होणार आहे.”

      मुंबई इंडियन्सच्या प्रवक्त्याने या भागीदारीबद्दल बोलताना सांगितले की, “उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकचे मुंबई इंडियन्स परिवारात स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. त्यांची मजबूत मूल्ये, ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन आणि आर्थिक समावेशनाबाबतची बांधिलकी आमच्या विचारसरणीशी सुसंगत आहे. आम्ही प्रभावी भागीदारीची अपेक्षा करतो.”

      या भागीदारीचा एक भाग म्हणून, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे चे उद्दिष्ट विविध ग्राहक वर्गांशी आपला संवाद आणि सहभाग वाढवणे, तसेच या हंगामादरम्यान राबवल्या जाणाऱ्या एकात्मिक मार्केटिंग उपक्रमांद्वारे व इतर नियोजित कार्यक्रमांद्वारे आपल्या ब्रँडची उपस्थिती अधिक ठळक करणे आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…