Home राजकीय जिल्हा परिषद अध्यक्षपदी शिल्पा खोत तर उपाध्यक्षपदी तानाजी पाटील यांची निवड

जिल्हा परिषद अध्यक्षपदी शिल्पा खोत तर उपाध्यक्षपदी तानाजी पाटील यांची निवड

2 second read
0
0
14

no images were found

 जिल्हा परिषद अध्यक्षपदी शिल्पा खोत तर उपाध्यक्षपदी तानाजी पाटील यांची निवड

    कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या शिल्पा शशिकांत खोत यांची तर उपाध्यक्ष पदी भाजपचे तानाजी पाटीतल यांची बिनविरोध निवड झाली.

पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित सदस्यांच्या झालेल्या विशेष सभेत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली. दरम्यान या निवडीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकिय घडामोडी झाल्या. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या जनसुराज्यकडून राष्ट्रवादीला विरोध, भाजपसाठीचा आग्रह. यातून थेट मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली शिष्टाई, तर मंत्री मुश्रीफ आणि आ. सतेज पाटील यांच्यातील मैत्रीचे कर्तव्य यातून काँग्रेसने विरोधात उमेदवारच न देण्याची घेतलेली भुमिका, पुढील ५ वर्षात पदांच्या कार्यकालाचे करून ठेवलेले जागा वाटप, त्यातून शिंदे शिवसेनेने घेतलेली संयम आणि सामंजस्याची भूमिका यामुळे अखेर कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवड निविघ्नपणे आणि बिनविरोध पार पडली.

महाविकास आघाडी कडून देखील अध्यक्षपदासाठी उमेदवार असल्याची शक्यत गृहीत धरून कोणतीही दगाबाजी होऊ नये यासाठी महायुतीच्या 51 सदस्यांना पन्हाळ्यावर ठेवण्यात आले होते. आज सकाळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिल्या शशिकांत खोत यांची निवड केली असल्याचे पत्र या बैठकीत दिले. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडून

शिल्पा शशिकांत खोत याच बरोबर भाजपकडून आ. अमल महाडिक यांचे कट्टर समर्थक असलेले मुडशिंगी मतदार संघातील तानाजी यांचे नाव निश्चित करण्यात आले. महायुतीच्या सदस्यांसमोर या दोन्ही नावांची घोषणा करण्यात आली.

अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वा खाली सर्वाधिक २० सदस्य निवडून आले असल्याने महायुतीत आपल्या पक्षाचा अध्यक्ष झाला पाहिजे यासाठी मंत्री मुश्रीफ आग्रही होते.

मंत्री मुश्रीफ यांनी जि. प. निवडणूक मात्र महायुतीतून बाहेर राहून आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बरोबर घेऊन लढवली होती. याच मुद्यावरून जनसुराज्यचे आ. विनय कोरे आणि मंत्री मुश्रीफ यांच्यात मतभेद झाले. तरीही निवडणूकीनंतर महायुतीत सहभागी होऊन मंत्री मुश्रीफ यांनी अध्यक्ष पद पदरात पाडून घेताना आपल्या कागल तालुक्यालाही झुकते माप दिले.

बोरवडे जिल्हा परिषद सदस्य शोभाताई फराकटे, व गिजवणे च्या सदस्य शैलेजा पाटील ही नावे आघाडीवर होती. तसेच दिवसभर या नावांपैकी एक नाव अध्यक्षपदासाठी निश्चित होईल असे असतानाच आज शिल्पा खोत यांचे नाव निश्चित केले. महायुतीकडून दोन्ही नावांची घोषणा झाल्यानंतर दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. विरोधी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रसिका पाटील आणि उपाध्यक्ष पदासाठी संभाजी पाटणकर यांनी उमेदवारी अर्जा दाखल केले होते.

दुपारी दोन वाजता झालेल्या विशेष सभेत पीठासन अधिकारी अमोल येडगे यांनी निवडीची प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी राष्ट्रवादीकडून विनंती केल्याने आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी सुचना दिल्याने विरोधी रसिका पाटील संभाजी पाटणकर यांनी माघार घेतली. आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीकाँग्रेस कडून शिल्पा खोत या अध्यक्ष तर उपाध्यक्षपदावर भाजपच्या तानाजी पाटील यांची निवड झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपदासाठी संमती दिली असली तरी शेवटपर्यंत डॉ. आमदार विनय कोरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष करण्यासाठी विरोध राहिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यरात्री फोन करत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बाजूने कौल दिला.निवडीनंतर महायुतीचे नेते,सदस्य कार्यकर्ते यांनी नुतन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे सभागृहातच अभिनंदन केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आरोग्य शिबिर संपन्न

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आरोग्य शिबिर संपन्न  कोल्हापूर,  : वाढत्या धकाधकीच्या…