Home Video स्वर्गीय श्री.विनायकराव क्षीरसागर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणादिनी महापालिका पंचगंगा स्मशानभूमीस १० हजार शेणी दान

स्वर्गीय श्री.विनायकराव क्षीरसागर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणादिनी महापालिका पंचगंगा स्मशानभूमीस १० हजार शेणी दान

5 second read
0
0
15

no images were found

स्वर्गीय श्री.विनायकराव क्षीरसागर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणादिनी महापालिका पंचगंगा स्मशानभूमीस १० हजार शेणी दान

कोल्हापूर(प्रतिनिधी) : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांचे वडील स्वर्गीय विनायकराव श्रीपतराव क्षीरसागर (माजी अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा बेकर्स असोसिएशन) यांना वयाच्या ८८ व्या वर्षी देवाज्ञा झाली. त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनी सामाजिक कार्यातून आदरांजली वाहण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्यावतीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीस १० हजार शेणींचे दान करण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी, स्वर्गीय श्री.विनायकराव क्षीरसागर यांना भावपूर्ण श्रधांजली अर्पण करीत, क्षीरसागर कुटुंबियांच्या दु:खात शिवसेना परिवार सहभागी आहे. शिवसेनेने नेहमीच समाजकार्याला अग्रस्थान दिले आहे. दु:खाच्या प्रसंगातही सामाजिक भावना जपावी या हेतून स्वर्गीय विनायकराव क्षीरसागर यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी शिवसेनेकडून कोल्हापूर महानगरपालिका पंचगंगा स्मशान भूमीस १० हजार शेणींचे दान करण्यात येत असल्याचे सांगितले.
यानंतर शिवसेनेकडून १० हजार शेणी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, परिवहन सदस्य रोहन अतिग्रे, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष दीपक चव्हाण, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, रमेश खाडे, उदय भोसले, सुनील जाधव, अरविंद मेढे, माजी नगरसेवक राजू हुंबे, शहर समन्वयक हर्षल सुर्वे, अनुसूचित जाती जमाती शहरप्रमुख प्रभू गायकवाड, फेरीवाले सेना शहरप्रमुख अर्जुन आंबी, कपिल नाळे, धनाजी कारंडे, अंकुश निपाणीकर, सुरेश माने, अर्जुन संकपाळ, राजवर्धन अर्जुनिकर, सचिन भोळे, मंदार तपकिरे, सचिन क्षीरसागर, किरण पाटील, सुशील भांदिगरे, धनाजी दळवी आदी शिवसेना पदाधिकारी, महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…