Home शैक्षणिक दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे स्कुल संसदेचे आयोजन

दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे स्कुल संसदेचे आयोजन

2 second read
0
0
116

no images were found

दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे स्कुल संसदेचे आयोजन

पुण्यातील 9 यशस्वी स्कुल संसद स्पर्धा पार पाडल्यानंतर दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे स्कुल संसदेच्या 10 व्या आवृत्तीचे संपूर्ण महाराष्ट्रात आयोजन करण्यात येणार असून त्याची अंतिम फेरी 3,4 व 5 फेब्रुवारी 2023 रोजी पुण्यात संपन्न होणार आहे. ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी संपूर्णपणे मोफत असून, त्यांची पुण्यातील अंतिम फेरीसाठी निवड झाल्यास त्यांच्या जेवणाचा व राहण्याचा खर्च हा आयोजकांकडून केला जाणार आहे. 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी राजकारण, राजनीती, लोकशाहीबाबत जाणून घेण्यासाठी व जागरूकता निर्माण करण्यासाठी स्कुल संसद हे एक अनोखे व्यासपीठ आहे. ही एक आदर्श संसद आहे जिथे विद्यार्थ्यांना संसद सदस्य बनून महत्त्वाच्या सामाजिक मुद्द्यांवर चर्चा करण्याबरोबरच त्यावर धोरणात्मक भाषण आणि ठराव करण्याची संधी मिळते.

स्कुल संसद 2023 मध्ये सहभागी होण्याकरिता व त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी 8262986169 या क्रमांकावर किंवा skoolsansad@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा.इयत्ता 8वी व 9वीच्या शालेय विद्यार्थ्यांनी मॉडेल पार्लमेंटचा अनोखा अनुभव घेण्यासाठी 15 नोव्हेंबर 2022 पूर्वी अर्ज पाठवणे गरजेचे आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…