Home शासकीय जिल्ह्यात ‘कॉपीमुक्त अभियान’ प्रभावीपणे राबविण्यात येणार -जिल्हाधिकारी अमोल येडगे

जिल्ह्यात ‘कॉपीमुक्त अभियान’ प्रभावीपणे राबविण्यात येणार -जिल्हाधिकारी अमोल येडगे

10 second read
0
0
21

no images were found

जिल्ह्यात ‘कॉपीमुक्त अभियान’ प्रभावीपणे राबविण्यात येणार -जिल्हाधिकारी अमोल येडगे

  इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पत्राद्वारे शुभेच्छा. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून परीक्षा देण्याचे आवाहन. जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची पाळत, तर काही ठिकाणी ड्रोनद्वारेही नजर.

 

कोल्हापूर,  : उद्यापासून (१० फेब्रुवारी) जिल्ह्यामध्ये १२ वीच्या परीक्षा सुरू होत आहेत आणि त्यानंतर २० फेब्रुवारीपासून १० वीच्या परीक्षाही सुरू होणार आहेत. या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांना जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा प्रशासनाकडून पत्राद्वारे शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा दक्षता समिती यांनी ‘कॉपीमुक्त अभियान’ बैठकीतून जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश दिले आहेत. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., शिक्षणाधिकारी माध्यमिक सुवर्णा सावंत, पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, शिक्षणाधिकारी योजना अनुराधा म्हेत्रे, एस.पी. बडे, डॉ.राजेंद्र भोई उपस्थित होते.

      यावर्षी जिल्हा प्रशासनाने ‘कॉपीमुक्त अभियान’ अतिशय प्रभावीपणे राबवण्याचे ठरवले असून, जिल्ह्यातील सर्वच परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. याचबरोबर विशेष बैठे व भरारी पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत. ज्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, अशा केंद्रांच्या परिसरात ड्रोनद्वारेही नजर ठेवली जाणार आहे. सर्व सीसीटीव्ही यंत्रणेचे गट शिक्षण अधिकारी स्तरावर सनियंत्रण केले जाणार आहे. कुठेही कॉपीचा प्रकार घडू नये यासाठी सर्व यंत्रणांना सूचना केल्या आहेत. प्रत्यक्ष, सीसीटीव्ही, व्हीडीओ कॅमेरा, ड्रोन अशा विविध माध्यमांतून आढळून येणाऱ्या प्रकारांवर कारवाई करीत गैरप्रकारात सहभागी विद्यार्थी, पर्यवेक्षक, कॉपी पुरवणारा यांच्यावर देखील कारवाई केली जाणार आहे. याचबरोबर गैरप्रकार होणाऱ्या केंद्रांचे परीक्षा केंद्र म्हणून असलेली मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया देखील राबविली जाणार आहे.

       जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, परीक्षा हा आयुष्यातील केवळ एक टप्पा आहे; त्यामुळे कोणताही ताण न घेता शांत चित्ताने परीक्षेला सामोरे जा. तुमची वर्षभराची मेहनत नक्कीच फळाला येईल. त्यांनी पालकांनाही विनंती केली आहे की, मुलांवर अवाजवी दडपण टाकू नका. त्यांना वेळेवर जेवण, पुरेशी झोप आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळेल याची काळजी घ्या. तसेच, कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करू नका किंवा परीक्षाविषयक अफवांवर विश्वास ठेवू नका.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…