Home शैक्षणिक फिजिक्‍सवालाकडून संपूर्ण भारतातील सीबीएसई इयत्ता दहावी विद्यार्थ्‍यांसाठी मोफत शंका निरसन साह्य आणि मॉक प्रीबोर्ड परीक्षेची सुविधा

फिजिक्‍सवालाकडून संपूर्ण भारतातील सीबीएसई इयत्ता दहावी विद्यार्थ्‍यांसाठी मोफत शंका निरसन साह्य आणि मॉक प्रीबोर्ड परीक्षेची सुविधा

2 min read
0
0
20

no images were found

फिजिक्‍सवालाकडून संपूर्ण भारतातील सीबीएसई इयत्ता दहावी विद्यार्थ्‍यांसाठी मोफत शंका निरसन साह्य आणि मॉक प्रीबोर्ड परीक्षेची सुविधा

     शिक्षण कंपनी फिजिक्‍सवाला (पीडब्‍ल्‍यू)ने विद्यार्थ्‍यांना साह्य करणाऱ्या उपक्रमाची घोषणा केली. या उपक्रमाचा २०२६ मध्‍ये इयत्ता दहावी सीबीएसई बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्‍यांना साह्य करण्‍याचा मनसुबा आहे. देशभरातील विद्यार्थी मोफत शंका निरसन आणि तज्ञांकडून मार्गदर्शन मिळवू शकतात. हा उपक्रम पीडब्‍ल्‍यू विद्यार्थ्‍यांसह देशभरातील कोणत्‍याही इयत्ता दहावीमध्‍ये शिकत असलेल्‍या विद्यार्थ्‍यांसाठी खुला आहे. हा उपक्रम परीक्षेदरम्‍यान येणारा अभ्‍यासाचा ताण कमी करण्‍यास मदत करण्‍यासाठी डिझाइन आला आहे.

       पीडब्‍ल्‍यू देशभरात विज्ञान व गणित विषयामधील ऑफलाइन प्रीबोर्ड परीक्षेची सुविधा देखील देईल, ज्‍यामागे विद्यार्थ्‍यांना सुसज्‍ज करण्‍याचा मनसुबा आहे. पीडब्‍ल्‍यूची प्रत्‍यक्ष केंद्रे जसे विद्यापीठ, पाठशाला व ट्यूशन सेंटर्स येथे या परीक्षा घेण्‍यात येतील, ज्‍यामुळे विद्यार्थ्‍यांना खऱ्या बोर्ड परीक्षेचा अनुभव मिळेल, तसेच परीक्षेबाबत येणारा ताण दूर होत विषयामधील प्रभुत्‍व व वेळेचे व्‍यवस्‍थापन करण्‍याची कौशल्‍ये सुधारण्‍यास मदत होईल.

       फिजिक्‍सवाला (पीडब्‍ल्‍यू)च्‍या विद्यापीठ-ऑफलाइनचे सीईओ अंकित गुप्‍ता म्‍हणाले, ”शिक्षणामध्‍ये कोणताच अडथळा आला नाही पाहिजे, विशेषत: विद्यार्थी बोर्ड परीक्षांसारख्‍या जीवनातील निर्णायक क्षणासाठी तयारी करत असताना त्‍यांना कोणत्‍याच समस्‍यांचा करावा लागला नाही पाहिजे. अनेक विद्यार्थ्‍यांना परीक्षेची तयारी करण्‍यासाठी पाहिजे तसा पाठिंबा व मार्गदर्शन मिळत नाही आणि एका शंकेचे निरसन झाले नाही तरी मोठा ताण येऊ शकतो. आमच्‍यासह नोंदणी केलेली असो किंवा नसो, प्रत्‍येक विद्यार्थ्‍यासाठी आमचे विद्यापीठ, पाठशाला व ट्यूशर सेंटर्स सुरू करत आम्‍ही विद्यार्थ्‍यांना शिक्षणामध्‍ये साह्य करत आहोत. विद्यार्थ्‍यांना पाठिंबा मिळत असल्‍याचे, आत्‍मविश्वास आणि त्‍यांच्‍या संपूर्ण क्षमतेसह उत्तम कामगिरी करण्‍यासाठी सुसज्‍ज असल्‍याचे वाटावे, अशी आमची महत्त्वाकांक्षा आहे.”  

       संपूर्ण भारतातील विद्यार्थी त्‍यांच्‍या जवळच्‍या पीडब्‍ल्‍यू विद्यापीठ, पाठशाला किंवा ट्यूशन सेंटरला भेट देऊ शकतात, जेथे त्‍यांना बोर्ड परीक्षेपर्यंत वैध असलेले डाऊट बस्‍टर पास मिळेल, तसेच शंका निरसन करण्‍यासाठी स्‍लॉट बुक करू शकतात. अनुभवी शिक्षकवर्ग विविध शंकांचे निरसन करतील, गुंतागूंतीच्‍या विषयांचे सविस्‍तरपणे स्‍पष्‍टीकरण करतील आणि परीक्षेमध्‍ये उत्तर लिहिण्‍याच्‍या तंत्रांबाबत धोरणात्‍मक मार्गदर्शन करतील. विद्यार्थी भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र, गणित व जीवशास्‍त्र अशा विषयांमधील शंकांबाबत स्‍पष्‍टीकरण मिळवू शकतात. तसेच त्‍यांना सीबीएसई इयत्ता दहावी अभ्‍यासक्रमाकरिता रिव्हिजन कार्डस् देखील मिळतील, ज्‍यामुळे परीक्षेची तयारी करण्‍यामध्‍ये साह्य मिळेल.       विद्यार्थी पीडब्‍ल्‍यू अॅपच्‍या माध्‍यमातून १ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्‍यात येणाऱ्या विज्ञान परीक्षेसाठी आणि ८ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्‍यात येणाऱ्या गणित परीक्षेसाठी त्‍यांच्‍या जवळच्‍या सेंटरमध्‍ये स्‍लॉट बुक करू शकतात.हा उपक्रम ३० सप्‍टेंबर २०२५ पर्यंत भारतातील १३२ शहरांमध्‍ये असलेल्‍या फिजिक्‍सवालाच्‍या १९२ तंत्रज्ञान-सक्षम विद्यापीठ व पाठशाला केंद्रांच्‍या नेटवर्कच्‍या माध्‍यमातून राबवला जात आहे. 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…