no images were found
अदाणी समूहातील तीन कंपन्यांना जपान क्रेडिट रेटिंग एजन्सीकडून (जेसीआर) ऐतिहासिक क्रेडिट रेटिंग प्राप्त
अहमदाबाद,: भारताच्या पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण टप्पा गाठत, जपानमधील अग्रगण्य रेटिंग संस्था जपान क्रेडिट रेटिंग एजन्सी (जेसीआर) ने अदाणी समूहातील तीन कंपन्यांचे — अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (एपीएसईझेड), अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेड (एजीईएल) आणि अदाणी एनर्जी सोल्यूशन्स लिमिटेड (एईएसएल) — दीर्घकालीन परकीय चलन क्रेडिट रेटिंग जाहीर केले असून तिन्ही कंपन्यांना ‘Stable Outlook’ देण्यात आला आहे. यामुळे समूहाची मजबूत आर्थिक शिस्त आणि जागतिक स्तरावरील विश्वासार्हता अधोरेखित झाली आहे
एपीएसईझेड ला ‘A-’ (Stable) रेटिंग देण्यात आले असून ते भारताच्या सार्वभौम (sovereign) रेटिंगपेक्षा एक पायरी वर आहे,भारतीय कॉर्पोरेटसाठी ही दुर्मिळ कामगिरी मानली जाते. विविधीकृत बंदर व लॉजिस्टिक्स पोर्टफोलिओ, सातत्यपूर्ण नफा, स्थिर रोकड प्रवाह आणि सुज्ञ आर्थिक व्यवस्थापन यामुळे कंपनीचे मजबूत क्रेडिट प्रोफाइल सिद्ध होते. कंपनी भारतातील सुमारे 30% कार्गो हाताळते आणि एकात्मिक लॉजिस्टिक्स क्षमतांमुळे आपले नेतृत्व अधिक बळकट करत आहे
एजीईएल आणि एईएसएल या दोन्ही कंपन्यांना ‘BBB+’ (Stable) रेटिंग देण्यात आले असून ते भारताच्या सार्वभौम रेटिंगच्या बरोबरीचे आहे. एईएसएल ने वीज प्रसारण व वितरण जाळ्याचा विस्तार, स्मार्ट मीटरिंग आणि नियमनाधारित स्थिर रोकड प्रवाहाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण वाढ साधली आहे. तर एजीईएल ने 16 GW पेक्षा जास्त क्षमतेसह, दीर्घकालीन वीज खरेदी करार आणि मजबूत कार्यप्रदर्शनाच्या बळावर देशातील आघाडीची अक्षय ऊर्जा कंपनी म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे .
तिन्ही कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय आर्थिक कामगिरी नोंदवली असून EBITDA मध्ये मोठी वाढ, नियंत्रित कर्जपातळी, दीर्घकालीन निधी उभारणी आणि मजबूत तरलता राखली आहे. जेसीआर च्या मूल्यमापनानुसार, अदाणी समूहाचा लवचिक व्यवसाय मॉडेल आणि आंतरराष्ट्रीय क्रेडिट मानकांशी सुसंगतता अधोरेखित झाली असून, या पातळीवर जेसीआर कडून मूल्यांकन मिळवणाऱ्या भारतीय पायाभूत सुविधा कंपन्यांपैकी या पहिल्या उदाहरणांपैकी एक आहे
या निमित्ताने अदाणी समूहाचे ग्रुप सीएफओ जुगेशिंदर सिंग म्हणाले, “हे ऐतिहासिक रेटिंग आमच्या शिस्तबद्ध आर्थिक व्यवस्थापनाची, मजबूत बॅलन्स शीटची आणि विविध पायाभूत सुविधा व्यवसायांमधील उत्कृष्ट अंमलबजावणीची पावती आहे. यामुळे जागतिक गुंतवणूकदार व वित्तसंस्थांचा आमच्यावर असलेला विश्वास अधिक दृढ झाला आहे आणि भारताच्या पायाभूत विकासात अग्रणी भागीदार म्हणून आमची भूमिका अधिक मजबूत झाली आहे.”