Home मनोरंजन  “प्रेक्षकांना आम्ही पडद्यावर जसे दिसतो, तसेच आम्ही पडद्याच्या मागेही आहोत- एक मोठे, उत्साही कुटुंब”:पूजा कातुर्डे

 “प्रेक्षकांना आम्ही पडद्यावर जसे दिसतो, तसेच आम्ही पडद्याच्या मागेही आहोत- एक मोठे, उत्साही कुटुंब”:पूजा कातुर्डे

10 second read
0
0
17

no images were found

 “प्रेक्षकांना आम्ही पडद्यावर जसे दिसतो, तसेच आम्ही पडद्याच्या मागेही आहोत- एक मोठे, उत्साही कुटुंब”:पूजा कातुर्डे

 ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेचे प्रेरणादायक कथानक आणि त्यातील चारचौघांसारखी वाटणारी पात्रे यामुळे ह्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत पुष्पा (करुणा पांडे) या मुख्य व्यक्तिरेखेसमोरील आव्हाने आणि तिचे यशापयश यांचे चित्रण केले असून ही टेलिव्हिजनवरील अत्यंत आवडत्या मालिकांपैकी एक आहे. केवळ मालिकेच्या पडद्यावरच्या नात्यांमध्येच आपलेपणा आहे असे नाही, तर या कलाकारांचे पडद्याच्या मागे सुद्धा एकमेकांशी असेच आत्मीयतेचे आणि मैत्रीपूर्ण नाते आहे. मालिकेत प्रार्थनाची भूमिका करणाऱ्या पूजा कातुर्डेला या स्नेह संबंधांविषयी खूप अप्रूप वाटते.

        पडद्याच्या मागे देखील कलाकारांमध्ये सुंदर मैत्री आहे. त्यामुळे सेट म्हणजे जणू एक मोठे कुटुंबच होते. पूजा सांगते की ही टीम बहुतांशी वेळ सेटवर एकत्र घालवते, मधल्या विश्रांतीच्या वेळेत देखील. आपापल्या खोलीत जाऊन बसण्याऐवजी हे कलाकार फ्लोरवरच राहणे पसंत करतात, गप्पा मारतात, विनोद सांगतात, गेम्स खेळतात ज्यामुळे सेटवर एक ऊर्जा असते आणि वातावरण आल्हाददायक होते. कलाकारांमधील हे सख्य स्वाभाविकपणे त्यांच्या अभिनयातून दिसते आणि मालिकेच्या सहज मोहकतेत भर घालते.

     या वातावरणाबद्दल बोलताना पूजा म्हणते, “प्रेक्षकांना आम्ही पडद्यावर जसे दिसतो, तसेच आम्ही पडद्याच्या मागेही आहोत- एक मोठे, उत्साही कुटुंब. सेटवर आमचे जे एकमेकांशी नाते आहे, ते खरोखर खास आहे. लोकांना असे वाटते की, विश्रांती मिळताच कलाकार आपापल्या खोलीत निघून जात असावेत. पण आमच्यासाठी मात्र याच्या अगदी विरुद्ध प्रकार असतो. आम्ही क्वचितच आपापल्या खोल्यांमध्ये जातो, कारण, सेट हीच आमची ‘स्वतः’ची जागा झाली आहे. या विश्रांतीच्या वेळेत आम्ही खूप गप्पा-टप्पा करतो, हसतो, धमाल करतो. कधीकधी आम्ही डम्ब शराड्स खेळतो तर कधी अंताक्षरी रंगते. नाहीतर नुसतेच गप्पा मारत बसतो, एकमेकांच्या फिरक्या घेत! पडद्याच्या मागे आमच्यात हा जो सहजपणा आणि केमिस्ट्री आहे, ती आम्हाला चांगले काम करण्यासाठी आणि वातावरण सकारात्मक आणि आनंदी ठेवण्यासाठी खूप मदत करते. ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मध्ये अभिनय करणे हे काम कमी आणि मोठ्या कुटुंबाचा भाग झाल्यासारखे अधिक वाटते.”

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक कोल्हापूर : …