2 min read
0
0
20

no images were found

अदाणी समूह कच्छमध्ये . लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

अहमदाबाद : अदाणी पोर्ट्स अँड एसईझेड लिमिटेड (एपीएसईझेड) चे व्यवस्थापकीय संचालक करण अदाणी यांनी रविवारी सांगितले की, अदाणी समूह पुढील पाच वर्षांत गुजरातमधील कच्छ विभागात १.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. करण अदाणी राजकोट येथे कच्छ आणि सौराष्ट्र विभागांसाठी आयोजित ‘व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषद’ (VGRC) ला संबोधित करत होते. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी तसेच अनेक प्रमुख उद्योगपती उपस्थित होते.

ते म्हणाले,“अदाणी समूह पुढील पाच वर्षांत कच्छ विभागात १.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास कटिबद्ध आहे. आम्ही आमचा खावडा प्रकल्प पूर्ण करू आणि २०३० पर्यंत संपूर्ण ३७ गीगावॅट क्षमतेचे संचालन सुरू करू. तसेच,पुढील १० वर्षांत मुंद्रा येथील आमची बंदर क्षमता दुप्पट करू.”

अदाणी यांनी सांगितले की,या प्रत्येक गुंतवणुका भारताच्या राष्ट्रीय प्राधान्यांशी –रोजगारनिर्मिती, औद्योगिक स्पर्धात्मकता, शाश्वतता आणि दीर्घकालीन बळकटी – सुसंगत आहेत. त्यांनी नमूद केले की, जागतिक अर्थव्यवस्था अनिश्चितता आणि विखुरलेपणाचा सामना करत असताना, भारत आशेचा किरण म्हणून पुढे येत आहे. भारत सुमारे आठ टक्के दराने वाढत असून, आपला उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) पाया विस्तारत आहे.

ते पुढे म्हणाले की,गुजरात हे भारतातील औद्योगिकदृष्ट्या प्रगत आणि जागतिक स्तरावर जोडलेले राज्य आहे. भारताच्या जीडीपीमध्ये गुजरातचा वाटा आठ टक्क्यांहून अधिक आहे, तर औद्योगिक उत्पादनात त्याची हिस्सेदारी १७ टक्के आहे.

करण अदाणी यांनी कच्छला परिवर्तनाचे एक प्रभावी प्रतीक म्हणून वर्णन केले. हा विभाग पूर्वी दूरस्थ आणि आव्हानात्मक मानला जात होता, मात्र आता तो भारतातील प्रमुख औद्योगिक, लॉजिस्टिक्स आणि ऊर्जा केंद्रांपैकी एक म्हणून उदयास आला आहे. त्यांनी पुढे जोडले की, कच्छमध्येच अदाणी समूहाचे मुंद्रा बंदर स्थित आहे.

या कार्यक्रमात वेलस्पन वर्ल्डचे चेअरमन बालकृष्ण गोयनका यांनी सांगितले की, त्यांची कंपनी गुजरातमध्ये थेट आणि अप्रत्यक्षपणे एक लाख लोकांना रोजगार देत आहे. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये वेलस्पन होम टेक्सटाइलचा बाजारातील वाटा २५ टक्क्यांहून अधिक आहे. 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

घराला पूर्णत्व देणाऱ्या बाईची हृदयस्पर्शी कथा ‘बाई तुझा आशीर्वाद’

घराला पूर्णत्व देणाऱ्या बाईची हृदयस्पर्शी कथा ‘बाई तुझा आशीर्वाद’ मराठी मालिका विश्वात नेह…