Home उद्योग अदाणी एंटरप्रायझेसने १,००० कोटी रुपयांचा तिसरा सार्वजनिक एनसीडी इश्यू जारी केला 

अदाणी एंटरप्रायझेसने १,००० कोटी रुपयांचा तिसरा सार्वजनिक एनसीडी इश्यू जारी केला 

5 second read
0
0
24

no images were found

अदाणी एंटरप्रायझेसने १,००० कोटी रुपयांचा तिसरा सार्वजनिक एनसीडी इश्यू जारी केला 

हा इश्यू मंगळवार, ६ जानेवारी २०२६ रोजी उघडेल आणि सोमवार, १९ जानेवारी २०२६ रोजी बंद होईल

अहमदाबाद, : १९९३ पासून शाश्वत पायाभूत सुविधा व्यवसाय उभारण्याचा दीर्घ अनुभव असलेली, अदाणी समूहाची प्रमुख कंपनी आणि बाजार भांडवलाच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी सूचीबद्ध व्यवसाय इन्क्यूबेटर, अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेड (“कंपनी” किंवा “एईएल”), ने सुरक्षित, मानांकित, सूचीबद्ध रिडीमेबल, नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर्सचा तिसरा सार्वजनिक इश्यू लाँच करण्याची घोषणा केली आहे.

अदाणी  ग्रुपचे ग्रुप सीएफओ जुगेशिंदर ‘रॉबी सिंग यांनी सांगितले, “एनसीडी जारी करण्याची ही तिसरी प्रक्रिया भारताच्या भांडवली बाजारापर्यंत पोहोच वाढवण्याच्या आणि किरकोळ गुंतवणूकदारांना दीर्घकालीन पायाभूत सुविधांच्या वाढीमध्ये वाटा मिळवून देण्याच्या आमच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. आमच्या मागील योजनांना मिळालेला जोरदार प्रतिसाद आमच्या धोरणावरील आणि आर्थिक शिस्तीवरील विश्वास दृढ करतो आणि आम्ही हीच गती कायम ठेवण्याचे आमचे ध्येय आहे. विमानतळ आणि रस्ते ते डेटा सेंटर्स आणि ग्रीन हायड्रोजनपर्यंत, भारताच्या पायाभूत सुविधांच्या पुढील लाटेसाठी एक इनक्यूबेटर म्हणून, एईएल भारताच्या आर्थिक परिवर्तनाला चालना देणारे व्यवसाय निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे,” असेही ते पुढे म्हणाले.

गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरू झालेला एईएलचा १,००० कोटी रुपयांचा दुसरा एनसीडी इश्यू पहिल्याच दिवशी ३ तासांत पूर्णपणे सबस्क्राइब झाला. एईएल ही एकमेव खाजगी कॉर्पोरेट कंपनी आहे (एनबीएफसी वगळून) जी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी सूचीबद्ध कर्ज उत्पादन सादर करत आहे, ज्यामुळे वैयक्तिक आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांना भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासाच्या प्रवासात सहभागी होण्याची एक दुर्मिळ संधी मिळत आहे. अलीकडील व्याजदर कपात आणि सौम्य व्याजदर चक्रामुळे, स्थिर, निश्चित-उत्पन्नाचे मार्ग शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एईएलचा एनसीडी इश्यू योग्य वेळी आला आहे. समान रेटिंग असलेल्या एनसीडी आणि मुदत ठेवींच्या तुलनेत स्पर्धात्मक परतावा देत असल्यामुळे, हा सार्वजनिक इश्यू गुंतवणूकदारांसाठी एक मौल्यवान संधी आहे.

प्रस्तावित एनसीडी ना केअर रेटिंग्स लिमिटेडने २२ डिसेंबर, २०२५ रोजीच्या रेटिंग पत्राद्वारे आणि २३ डिसेंबर, २०२५ रोजीच्या रेटिंग कारणांच्या प्रेस रिलीझद्वारे “केअर एए-; स्टेबल” आणि आयसीआरए लिमिटेडने २० डिसेंबर, २०२५ रोजीच्या रेटिंग पत्राद्वारे आणि २२ डिसेंबर, २०२५ रोजीच्या रेटिंग कारणांच्या प्रेस रिलीझद्वारे “[आयसीआरए] एए- (स्टेबल)” असे मानांकन दिले आहे. या मानांकनाच्या सिक्युरिटीजमध्ये आर्थिक जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण करण्याच्या बाबतीत उच्च दर्जाची सुरक्षितता मानली जाते. अशा सिक्युरिटीजमध्ये क्रेडिट जोखीम खूप कमी असते.

या इश्यूचा मूळ आकार ५०० कोटी आहे, आणि अतिरिक्त ५०० कोटींपर्यंतची अतिरिक्त वर्गणी राखून ठेवण्याचा पर्याय (“ग्रीन शू ऑप्शन”) उपलब्ध आहे, ज्यामुळे एकूण रक्कम १,००० कोटी होईल (“इश्यू” किंवा “इश्यूचा आकार”). हा इश्यू ६ जानेवारी २०२६ रोजी खुला होईल आणि १९ जानेवारी २०२६ रोजी बंद होईल, तथापि तो लवकर बंद करण्याचा किंवा मुदतवाढ देण्याचा पर्याय उपलब्ध आहे. प्रत्येक एनसीडीचे दर्शनी मूल्य १००० आहे. प्रत्येक अर्ज किमान १० एनसीडीसाठी आणि त्यानंतर १ एनसीडीच्या पटीत असेल. अर्जाचा किमान आकार १०,००० असेल.

या इश्यूच्या रकमेपैकी किमान ७५% रक्कम कंपनीने घेतलेल्या कर्जाची पूर्ण किंवा अंशतः प्रीपेमेंट, परतफेड किंवा पेमेंट करण्यासाठी; आणि/किंवा अशा कर्जावरील कोणतेही व्याज देण्यासाठी वापरली जाईल आणि उर्वरित शिल्लक रक्कम (जास्तीत जास्त २५% पर्यंत) सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरली जाईल.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…