Home उद्योग एपीएसईझेडने ऑस्ट्रेलियातील एनक्यूएक्सटीचे अधिग्रहण पूर्ण केले; 2030 पर्यंत 100 कोटी टन कार्गो उद्दिष्टाकडे मोठे पाऊल

एपीएसईझेडने ऑस्ट्रेलियातील एनक्यूएक्सटीचे अधिग्रहण पूर्ण केले; 2030 पर्यंत 100 कोटी टन कार्गो उद्दिष्टाकडे मोठे पाऊल

6 second read
0
0
31

no images were found

एपीएसईझेडने ऑस्ट्रेलियातील एनक्यूएक्सटीचे अधिग्रहण पूर्ण केले; 2030 पर्यंत 100 कोटी टन कार्गो उद्दिष्टाकडे मोठे पाऊल

अहमदाबाद, : भारतातील सर्वात मोठी एकात्मिक वाहतूक उपयुक्तता (इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट युटिलिटी) असलेल्या अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (एपीएसईझेड) ने ऑस्ट्रेलियातील नॉर्थ क्वीन्सलँड एक्सपोर्ट टर्मिनल (एनक्यूएक्सटी) चे 100 टक्के अधिग्रहण पूर्ण केले आहे. हे अधिग्रहण सर्व आवश्यक अटी व मंजुरीनंतर पूर्ण झाले असून, यामध्ये ‘मेजॉरिटी ऑफ मायनॉरिटी’ भागधारक, भारतीय रिझर्व्ह बँक तसेच ऑस्ट्रेलियाच्या फॉरेन इन्व्हेस्टमेंट रिव्ह्यू बोर्डची मंजुरी समाविष्ट आहे. या व्यवहाराअंतर्गत एपीएसईझेडने विक्रेता कंपनी कारमायकेल रेल अँड पोर्ट सिंगापूर होल्डिंग्स पीटीई लिमिटेडला प्रत्येकी ₹2 दर्शनी मूल्याचे 14,38,20,153 इक्विटी शेअर्स प्राधान्य तत्त्वावर वाटप केले आहेत. या अधिग्रहणानंतर आर्थिक वर्ष 2026 साठी एपीएसईझेडचे प्रो-फॉर्मा ईबीआयटीडीए मार्गदर्शन ₹22,350–23,350 कोटींवर पोहोचले आहे, जे यापूर्वी ₹21,000–22,000 कोटी होते. तसेच, कार्गो व्हॉल्यूम मार्गदर्शन 505–515 दशलक्ष मेट्रिक टन (एमएमटी) वरून वाढून 545–555 एमएमटी झाले आहे.

     एनक्यूएक्सटीच्या समावेशामुळे एपीएसईझेड 2030 पर्यंत 100 कोटी टन कार्गो हाताळणीच्या आपल्या उद्दिष्टाच्या अधिक जवळ पोहोचले आहे. एपीएसईझेडचे होल-टाइम डायरेक्टर आणि सीईओ अश्विनी गुप्ता यांनी सांगितले, “एनक्यूएक्सटीचे अधिग्रहण एपीएसईझेडच्या विकास प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. ही मजबूत भौगोलिक स्थान, उत्तम वाढीच्या संधी आणि शाश्वततेचा उत्कृष्ट अनुभव असलेली मालमत्ता आहे. एनक्यूएक्सटीमुळे इस्रायल, कोलंबो आणि टांझानिया येथील आमच्या आंतरराष्ट्रीय बंदरांसह ईस्ट–वेस्ट ट्रेड कॉरिडॉरवरील आमची उपस्थिती अधिक बळकट होईल. एनक्यूएक्सटीला एपीएसईझेडमध्ये सामील करताना आम्हाला आनंद होत आहे.” एनक्यूएक्सटी ही उच्च-वाढीची व रोख उत्पन्न निर्माण करणारी मालमत्ता असून तिचा आधार ‘टेक-ऑर-पे’ करारांवर आधारित स्थिर ग्राहक आहेत. आर्थिक वर्ष 2025 मध्ये एनक्यूएक्सटीची करारबद्ध क्षमता 4 कोटी टन इतकी होती आणि या कालावधीत सुमारे ₹1,900 कोटींचा ईबीआयटीडीए नोंदवण्यात आला. प्रो-फॉर्मा आधारावर, आर्थिक वर्ष 2025 मध्ये एपीएसईझेडच्या एकूण महसुलात एनक्यूएक्सटीचा सुमारे 6 टक्के आणि ईबीआयटीडीएमध्ये 7 टक्के वाटा होता.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

ॲमेझॉन इंडियाची मोठी घोषणा: १२.५ कोटी उत्पादनांवर झिरो रेफरल फी, विक्रेत्यांना ७०% पर्यंत बचत

ॲमेझॉन इंडियाची मोठी घोषणा: १२.५ कोटी उत्पादनांवर झिरो रेफरल फी, विक्रेत्यांना ७०% पर्यंत …