no images were found
अदाणी पॉवरला एनएसई सस्टेनेबिलिटी कडून उत्कृष्ट ईएसजी कामगिरीसाठी मान्यता
अहमदाबाद,:भारतातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील वीज उत्पादक कंपनी असलेल्या अदाणी पॉवर लिमिटेडने आज जाहीर केले की, एनएसई इंडेक्स लिमिटेडची उपकंपनी आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया समूहाचा भाग असलेल्या एनएसई सस्टेनेबिलिटी रेटिंग्स अँड अॅनालिटिक्स लिमिटेडने सार्वजनिकरित्या उपलब्ध माहितीच्या आधारे कंपनीचे मूल्यांकन केले आणि ‘६५’ गुण दिले आहेत.या गुणांमुळे अदाणी पॉवरला ‘अॅस्पायरिंग’ श्रेणीत स्थान मिळाले आहे.
या समान मूल्यमापनात अदाणी पॉवरने इतर सर्व प्रमुख थर्मल, मिश्र इंधन आणि एकात्मिक ऊर्जा कंपन्यांपेक्षा उच्च क्रमांक मिळवला असून, पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन (ईएसजी) तत्त्वांप्रती असलेली कंपनीची दृढ बांधिलकी आणि जबाबदार व्यावसायिक पद्धतींसह शाश्वत विकासावर असलेले धोरणात्मक लक्ष याचे प्रतिबिंब यातून दिसून येते.
अदाणी पॉवरचा विविध ईएसजी उपक्रमांवर आणि कार्यात्मक उत्कृष्टतेवर असलेला सातत्यपूर्ण भर सर्वोत्तम उद्योग मानकांच्या तुलनेत मोजला गेला आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी कंपनीने अल्ट्रा सुपर क्रिटिकल बॉयलर्ससारखी प्रगत उत्सर्जन व्यवस्थापन तंत्रज्ञान प्रणाली अंमलात आणली असून, सतत निरीक्षण व दुरुस्ती प्रणालींमध्ये गुंतवणूक केली आहे. ऊर्जा कार्यक्षमतेच्या उपाययोजनांसोबतच, स्थानिक जलस्रोतांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी ‘झिरो लिक्विड डिस्चार्ज’ प्रणाली स्वीकारून जलसंवर्धनालाही प्राधान्य देण्यात आले आहे.
सामाजिक पातळीवर, शिक्षण, आरोग्यसेवा आणि कौशल्य विकासावर भर देत कंपनीने समुदाय विकास कार्यक्रमांचा विस्तार केला आहे. वंचित विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, आरोग्य शिबिरे आणि उपजीविका वृद्धी प्रकल्प यांसारखे उपक्रम समावेशक विकासासाठी अदाणी पॉवरची बांधिलकी दर्शवतात. तसेच, सर्व प्रकल्पस्थळांवर कर्मचारी कल्याण, सुरक्षा प्रशिक्षण आणि विविधता व समावेशकतेला प्रोत्साहन देण्यावरही कंपनी विशेष भर देते.
प्रशासनाच्या बाबतीत, अदाणी पॉवरने नियामकांनी ठरवलेल्या किमान आवश्यकतांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. नामनिर्देशन व वेतन समितीतील स्वतंत्र संचालकांचे प्रमाण अनुपालनाच्या आवश्यकतेपेक्षा अधिक आहे. त्याचप्रमाणे, लेखापरीक्षण समितीतील स्वतंत्र संचालकांचे प्रतिनिधित्व वैधानिक मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा जास्त असून, जोखीम व्यवस्थापन समितीची रचना आवश्यक स्वतंत्र संचालकांच्या मर्यादेपेक्षा अधिक आहे. कंपनीने पुरवठादार आणि कंत्राटदारांसाठीही कठोर ईएसजी मानके स्वीकारली असून, संपूर्ण मूल्यसाखळीत जबाबदार पद्धती सुनिश्चित केल्या आहेत.
या उपक्रमांद्वारे अदाणी पॉवर ऊर्जा क्षेत्रात जबाबदार आणि शाश्वत व्यवसायासाठी नवे मापदंड स्थापित करत आहे.एनएसई सस्टेनेबिलिटी रेटिंगसोबतच, अलीकडील जागतिक मूल्यमापनांमध्ये सस्टेनेलिटिक्सकडून ‘मध्यम जोखीम’ईएसजी रिस्क रेटिंग (२९.२ गुण) प्राप्त झाले असून, जागतिक इलेक्ट्रिक युटिलिटी उद्योगाच्या सरासरी ३६.९ गुणांच्या तुलनेत हे अधिक चांगले आहे (कमी गुण म्हणजे चांगली कामगिरी). तसेच, सीएसआरहबने एपीएलला ७७ टक्के ईएसजी रेटिंग दिले असून, ते जागतिक उद्योग सरासरी ५१ टक्क्यांपेक्षा लक्षणीयरीत्या अधिक आहे. या स्वतंत्र मूल्यमापनांमुळे अदाणी पॉवर ईएसजीच्या उद्दिष्टांप्रती तसेच सर्व भागधारकांसाठी दीर्घकालीन शाश्वत मूल्यनिर्मितीच्या दिशेने आपली बांधिलकी कायम ठेवत असल्याचे स्पष्ट होते.