no images were found
जसप्रीत बुमराहने स्ट्रीक्सची भारतातील गतीशील, स्टाइलप्रती जागरूक ग्राहकांसाठी मोहिम ‘मेन फास्ट, स्ट्रीक्स सुपरफास्ट’ला पाठिंबा दिला
मुंबई, – स्ट्रीक्स या हायजेनिक रिसर्च इन्स्टिट्यूट (एचआरआय)च्या भारतातील आघाडीच्या हेअर कलर व केअर ब्रँडने आपले वैविध्यपूर्ण इनोव्हेशन स्ट्रीक्स शॅम्पू हेअर कलरसाठी प्रॉडक्ट अॅम्बेसेडर म्हणून भारतीय क्रिकेट संघामधील प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. उत्साहवर्धक नवीन मोहिम ‘मेन फास्ट, स्ट्रीक्स सुपर-फास्ट’च्या माध्यमातून या सहयोगाला सादर करण्यात आले आहे. ही मोहिम आत्मविश्वास, गती आणि आकर्षक स्टाइलला साजरे करते.
गती, दर्जात्मक कामगिरी आणि सातत्यतेसाठी ओळखला जाणारा जसप्रीत बुमराह स्ट्रीक्स शॅम्पू हेअर कलरची मुलभूत कटिबद्धता: गती व दर्जात्मक कार्यक्षमतेला सादर करतो. जसप्रीत बुमराहचे शिस्तबद्ध व्यक्तिमत्त्व आणि लोकप्रियता त्याला जलद, गुणकारी, उच्च दर्जाच्या निष्पत्तींवर डिझाइन करण्यात आलेल्या उत्पादनासाठी योग्य निवड बनवते. मोहिमेची टॅगलाइन ‘मेन फास्ट, स्ट्रीक्स सुपरफास्ट’द्वारे नेतृत्वित नवीन टीव्हीसी उत्साहवर्धक व कार्यक्षमता-केंद्रित कथानकाच्या माध्यमातून या तत्त्वाला प्रत्यक्षात आणते. जसप्रीत बुमराहसोबत हे कथानक स्मार्ट ग्रुमिंग दर्जाला सादर करते, जो आधुनिक, आकर्षक स्टाइलसाठी नवीन मापदंड आहे.
स्ट्रीक्स शॅम्पू हेअर कलरची किंमत १५ रूपयांपासून सुरू होते आणि शॅम्पूप्रमाणे वापरता येतो, जो फक्त ५ मिनिटांमध्ये केसांना कलर करतो. स्ट्रीक्स शॅम्पू हेअर कलर भारतातील ग्राहकांसाठी त्वरित ग्रूमिंगला नव्या उंचीवर घेऊन जात आहे. भारतातील पश्चिम, उत्तर व पूर्व भागांमध्ये प्रबळ नेतृत्व कायम राखत ब्रँड हेअर कलरिंगचे लोकशाहीकरण करण्याच्या मिशनवर आहे, जेथे लाखो व्यक्तींसाठी केसांना कलर करणे त्वरित, अधिक सोईस्कर व सोपे करत आहे.
हायजेनिक रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मार्केटिंगच्या वरिष्ठ उपाध्यक्षा प्रियंका पुरी या सहयोगाबाबत आपला आनंद व्यक्त करत म्हणाल्या, ”आम्हाला स्ट्रीक्स कुटुंबामध्ये जसप्रीत बुमराहचे स्वागत करताना आनंद होत आहे. स्ट्रीक्स नेहमी सौंदर्य, आत्मविश्वास आणि दैनंदिन ग्लॅमरसाठी ओळखले जाते आणि आमचा स्ट्रीक्स शॅम्पू हेअर कलर जलदपणे त्या कटिबद्धतेला प्रत्यक्षात आणतो. आजच्या ग्राहकांची त्वरित आकर्षक दिसण्याची इच्छा आहे आणि आमचा सुपर-फास्ट फॉर्म्युला काही मिनिटांमध्ये केसांना आकर्षक कलर देतो, जेथे केसांची शाइन किंवा दर्जावर परिणाम होत नाही.
बुमराहची अचूकता, कामगिरी आणि लोकप्रियता त्याला ब्रँडसाठी परिपूर्ण बनवते. ब्रँडचा विश्वास आहे की आकर्षक दिसणे त्वरित, सोपे आणि अद्वितीयरित्या ग्लॅमरस असले पाहिजे. ‘मेन फास्ट, स्ट्रीक्स सुपर-फास्ट’ मोहिम आम्ही श्रेणीमध्ये आणत असलेल्या पैलूला सादर करते, तो म्हणजे आकर्षक हेअर कलर, जो भारतातील व्यक्तींच्या केसांना त्वरित कलर करण्याची इच्छा पूर्ण करतो.”
या सहयोगाबाबत मत व्यक्त करत भारतातील गेम-चेंजर व मॅच-विनिंग खेळाडू आणि राइज वर्ल्डराइडचे प्रतिनिधीत्व करणारा जसप्रीत बुमराह म्हणाला, ”माझा खेळ असो किंवा स्वत:ला आकर्षक स्वरूपात सादर करायचे असो मी करत असलेल्या उत्तम कामगिरीमध्ये सातत्यता महत्त्वाची आहे. स्ट्रीक्ससोबत सहयोग करणे स्वाभाविक आहे, कारण त्यांच्या शॅम्पू हेअर कलरमधून मी महत्त्व देत असलेली मूल्ये म्हणजेच गती, आत्मविश्वास दिसून येतात, तसेच त्यांच्या हेअर कलरमधून मिळणाऱ्या निष्पत्तींवर तुम्ही विश्वास ठेवू शकता. ‘मेन फास्ट, स्ट्रीक्स सुपर-फास्ट’ निश्चितच वाइब व भावना आहे, ज्यांच्याशी मी जुडलो जात आहे.”
‘मेन फास्ट, स्ट्रीक्स सुपर-फास्ट’ मोहिम टेलिव्हिजन, डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर राबवण्यात येईल, ज्यामध्ये बुमराह आकर्षक, आत्मविश्वासपूर्ण व समकालीन अवतारामध्ये पाहायला मिळेल आणि स्ट्रीक्सचा गती, स्टाइल व आत्मविश्वासप्रती दृष्टिकोन दिसून येईल.