Home राजकीय राज्यात नवीन राजकीय समीकरणे उदयाला येण्याची शक्यता-हेमंत पाटील

राज्यात नवीन राजकीय समीकरणे उदयाला येण्याची शक्यता-हेमंत पाटील

1 second read
0
0
74

no images were found

राज्यात नवीन राजकीय समीकरणे उदयाला येण्याची शक्यता-हेमंत पाटील

मुंबई, : राज्यात गेल्या काही काळात घडलेल्या विविध राजकीय घटनाक्रमानंतर महायुतीचे सरकार विक्रमी बहुमताने सत्तेवर आरूढ झाले. भाजप-शिवसेना (शिंदे) आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार सुरळीत सुरू असतांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानेसरकारमधील मित्रपक्षामध्ये मिठाचा खडा पडलाय. नवीन राजकीय समीकरणे त्यामुळे उदयाला येण्याची शक्यता आहे, असे मत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी शनिवारी (ता.२९) व्यक्त केले.
एकमेकांच्या नेत्यांना गळाला लावून मित्रपक्षांमध्येच सुरूंग लावण्याचा प्रकार टोकाला गेल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेत्यांची कानउघाडणी केली. यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत. अशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचारात शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडून एकनाथ शिंदे यांचे करण्यात आलेले कौतुक आणि शिंदेची पवारांसोबत वाढत चाललेली जवळीक, सर्वांच्या भुवया उंचावणाऱ्या आहेत.
सरकारमध्ये शिंदे यांची कुंचंबना होत असल्याची चर्चा काहींकडून पेरली जातेय. अशात शिंदे दुसरा पर्यायाची चाचपणी करीत असल्याचे या घटनाक्रमावरून अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जातोय. पंरतु, भाजप वर याचा कुठला परिणाम पडणार नाही, हे तेवढेच खरे आहे. भाजपकडे प्रचंड बहुमत आहे. शिवाय अजित दादांची साथ सरकारला आहे. शिंदेची शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या नावावर निवडून आले आहेत. अशात शिंदे यांना पक्ष वाचवण्यासाठी अखेरपर्यंत भाजपची मदत लागेलच. भाजप मधील वितुष्टांना पक्षप्रवेशदेणे त्यामुळे शिंदेंनी टाळले पाहिजे, असे पाटील म्हणाले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…