no images were found
अदाणी डिफेन्स अँड एरोस्पेसच्या कानपूर अॅम्युनिशन कॉम्प्लेक्सने 2025 चा एसआयडीएम चॅम्पियन पुरस्कार जिंकला
महत्वाचे मुद्दे :
· कानपूर येथील अदाणी अॅम्युनिशन कॉम्प्लेक्सला भारतातील डिझाइन, मॅन्युफॅक्चरिंग आणि टेस्टिंग एक्सलन्ससाठी एसआयडीएम चॅम्पियन पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले.
· ही मान्यता भारतातील खासगी संरक्षण उत्पादन क्षेत्र मजबूत करण्याच्या आणि देशाच्या धोरणात्मक आत्मनिर्भरतेस हातभार लावण्याच्या अदाणी डिफेन्स अँड एरोस्पेसच्या दृष्टिकोनाला बळकटी देते.
· हा पुरस्कार समूहाच्या स्वदेशी, तंत्रज्ञानावर आधारित आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक संरक्षण उत्पादन केंद्र विकसित करण्याच्या दीर्घकालीन वचनबद्धतेला अधोरेखित करतो.
अहमदाबाद, : भारतातील अग्रगण्य डिफेन्स आणि एरोस्पेस कंपन्यांपैकी एक असलेल्या अदाणी डिफेन्स अँड एरोस्पेसला सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स (एसआयडीएम) कडून डिझाइन, मॅन्युफॅक्चरिंग आणि टेस्टिंग एक्सलन्ससाठी ‘एसआयडीएम चॅम्पियन पुरस्कार 2025’ प्रदान करण्यात आला आहे. ही मान्यता कंपनीच्या उत्तर प्रदेशातील कानपूर येथील अत्याधुनिक अॅम्युनिशन कॉम्प्लेक्ससाठी देण्यात आली आहे.
हा पुरस्कार माननीय संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह यांच्या हस्ते, तसेच संरक्षण सचिव श्री. राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत देण्यात आला. या केंद्राच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगत उत्पादन क्षमता ओळखून हा सन्मान देण्यात आला आहे. 500 एकरांवर पसरलेले अदाणी अॅम्युनिशन कॉम्प्लेक्स हे भारतातील सर्वात प्रगत आणि एकत्रित दारुगोळा उत्पादन केंद्र आहे. हे केंद्र इंडस्ट्री 4.0 मानकांनुसार विकसित करण्यात आले असून, ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित अचूक प्रणालींनी सुसज्ज आहे. या तंत्रज्ञानामुळे लहान, मध्यम आणि मोठ्या कॅलिबरच्या दारुगोळ्याच्या उत्पादनात सातत्य, सुरक्षितता आणि उच्च गुणवत्ता सुनिश्चित केली जाते.
ही मान्यता अदाणी डिफेन्स अँड एरोस्पेसच्या जागतिक दर्जाच्या उत्पादन क्षमता विकसित करण्याच्या बांधिलकीला पुन्हा अधोरेखित करते. कंपनीचे हे प्रयत्न भारतातील स्वदेशी संरक्षण उत्पादन व्यवस्था बळकट करण्यासोबतच ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या सरकारच्या दृष्टिकोनाशी पूर्णपणे सुसंगत आहेत.
अदाणी डिफेन्स अँड एरोस्पेसचे सीईओ श्री. आशिष राजवंशी म्हणाले, “एसआयडीएम चॅम्पियन पुरस्कार हा आमच्या त्या प्रयत्नांचा पुरावा आहे ज्यांतून आम्ही स्वदेशी आणि तंत्रज्ञानावर आधारित संरक्षण उत्पादन व्यवस्था उभारली आहे. ही व्यवस्था देशाच्या आत्मनिर्भरतेला बळकटी देते आणि त्याच्या धोरणात्मक तयारीला अधिक सक्षम बनवते. कानपूर अॅम्युनिशन कॉम्प्लेक्स हे इंडस्ट्री 4.0 तंत्रज्ञान आणि मोठ्या प्रमाणातील नवकल्पना भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्राला नवीन दिशा देऊ शकतात आणि देशाला जागतिक स्तरावरील उत्पादन केंद्र म्हणून स्थापित करू शकतात याचे एक उदाहरण आहे.”
अदाणी अॅम्युनिशन कॉम्प्लेक्स हे आत्मनिर्भर भारताच्या प्रवासातील एक महत्त्वाचे आधारस्तंभ ठरले आहे. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, प्रगत उत्पादन तंत्रज्ञान आणि उत्कृष्टतेसाठीची दृढ बांधिलकी यांच्या माध्यमातून हे केंद्र देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला अधिक बळकटी देत आहे.