no images were found
नागपूर-गोवा शक्तिपीठ द्रुतगती मार्ग : भक्ती, विकास आणि पर्यटनाचा संगम
नागपूर ते गोवा जोडणारा ८०२ कि.मी. लांबीचा शक्तिपीठ द्रुतगती मार्ग महाराष्ट्राच्या श्रद्धा, संस्कृती आणि प्रगतीचा नवा अध्याय ठरणार आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांमधून, ३९ तालुके व ३७० गावे जोडणारा हा महामार्ग धार्मिक पर्यटन, ग्रामीण अर्थव्यवस्था, उद्योग व रोजगाराला चालना देणार आहे.
महामार्गामुळे माहूर रेणुका माता, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, तुळजापूर, पंढरपूर, कोल्हापूर अंबाबाई, गणपतीपुळे आदी प्रमुख भक्तिस्थळांना भाविकांना एका अखंड प्रवासात दर्शन घेणे सुलभ होईल. तसेच मार्गावरील ६५ मोठे, १७४ छोटे पूल, २१ बोगदे (५ कि.मी. सर्वात लांब), २६ जंक्शन व ११ रेल्वे ओव्हरब्रिज या आधुनिक सुविधांमुळे व्यापार व वाहतूक सुलभ होईल.
सुमारे ८६,३५८ कोटींचा हा प्रकल्प राज्यातील पर्यटन, कृषी, उद्योग आणि ग्रामीण भागातील हॉटेल-व्यवसाय, होम-स्टे, हस्तकला यांना मोठी चालना देईल. सध्या भूसंपादन, रस्त्याचे ट्रेसिंग आणि पर्यावरणीय मंजुरीची प्रक्रिया सुरू असून, हा महामार्ग आगामी काळात महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांचा मैलाचा दगड ठरणार आहे.
—