no images were found
एल्जी इक्विपमेंट्सने सादर केला मागणी-पुरवठा तत्वावर आधारित अभिनव कॉम्प्रेसर
कोल्हापूर,(प्रतिनिधी ) : जगातील अग्रगण्य एअर कॉम्प्रेसर उत्पादक कंपनी एल्जी इक्विपमेंट्स (बीएसई: 522074, एनएसई: ELGIEQUIP) ने आज ‘जितकी मागणी=तितकाच पुरवठा’ या तत्त्वावर आधारित आपला नवीन कॉम्प्रेसर बाजारात आणला आहे. हे तंत्रज्ञान स्थिर गतीने चालणाऱ्या कॉम्प्रेसरला मागणीनुसार हवेचा पुरवठा करणाऱ्या यंत्रणेत रूपांतरित करते, ज्यामुळे ऊर्जा बचतीसह कार्यक्षमता वाढते.
प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे:
ऊर्जा बचत: या नवीन कॉम्प्रेसरमुळे उर्जेत १७ टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते, जी व्हीएफडी (VFD) प्रणालीसारखी प्रभावी आहे, परंतु किंमत मात्र स्थिर कॉम्प्रेसरइतकीच आहे.
कार्यक्षम आणि शाश्वत: हे तंत्रज्ञान हवेच्या प्रवाहाचे स्मार्टपणे फेरवहन करून मागणीनुसार पुरवठ्याचे स्वयंचलित समायोजन करते. यामुळे यंत्रावरचा ताण कमी होतो आणि कार्बन उत्सर्जनामध्ये घट होते.
यंत्राच्या आयुष्यात वाढ: कमी ‘कट-इन’ आणि ‘कट-आउट’ चक्रांमुळे यंत्राची झीज कमी होते आणि त्याचे आयुष्य वाढते.
कमी भांडवली खर्च: हे उत्पादन मोठ्या गुंतवणुकीची गरज नसतानाही उत्पादन प्रक्रियेत कार्यक्षमता आणते.
प्रणाली कशी कार्य करते?
सध्याच्या स्थिर वेगाने चालणाऱ्या कॉम्प्रेसरमध्ये हवेची मागणी कमी झाल्यावरही ते त्याच वेगाने कार्यरत राहतात, ज्यामुळे ऊर्जेचा अपव्यय होतो आणि यंत्रावर ताण येतो. एल्जीच्या ‘मागणी=पुरवठा’ तंत्रज्ञानामध्ये, कॉम्प्रेसरच्या आत हवेचा प्रवाह कुशलतेने पुर्नप्रवाहित केला जातो, ज्यामुळे पुरवठा नेहमी मागणीच्या बरोबरीने राहतो. यामुळे अनावश्यक कार्यचक्र (सायकलिंग) कमी होते आणि उत्पादन प्रक्रियेत हवेचा दाब स्थिर राखला जातो.
हे नवीन उत्पादन विविध उद्योग जसे की कापड, वाहन, औषध, अन्न, पेय, इलेक्ट्रॉनिक्स आणि अभियांत्रिकीसाठी उपयुक्त आहे. एल्जीने ईजी आणि ईक्यू मालिकेतील या कॉम्प्रेसरची भारतात थेट प्रकल्पांमध्ये उभारणी सुरू केली आहे. अधिक माहितीसाठी ग्राहक स्थानिक वितरण प्रतिनिधींशी संपर्क साधू शकतात.