Home संस्कृतिक युवा’च्या ‘माय बाप्पा वर्कशॉप’मुळे भारतभरातील ८०+ शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित

युवा’च्या ‘माय बाप्पा वर्कशॉप’मुळे भारतभरातील ८०+ शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित

8 second read
0
0
47

no images were found

युवा’च्या ‘माय बाप्पा वर्कशॉप’मुळे भारतभरातील ८०+ शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित ~ खास तयार केलेल्या किट्सचा वापर करून विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवाला साजेशा कलाकृती साकारल्या ~
कोल्हापूर, (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या मंगलप्रसंगी नवनीत एज्युकेशन लिमिटेडच्या ‘युवा’ या स्टेशनरी विभागाने विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘माय बाप्पा वर्कशॉप’चे देशभरातील ८०हून अधिक शाळांमध्ये आयोजन केले. या विधायक उपक्रमात ‘युवा’ने खास तयार केलेल्या किट्सच्या साहाय्याने विद्यार्थ्यांनी अनोख्या कलाकृती साकारत परंपरा आणि संस्कृतीला सर्जनशीलतेची जोड देत गणेशभक्तीचा उत्सव साजरा केला.’युवा’तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘माय बाप्पा वर्कशॉप’या वार्षिक कार्यशाळेच्या माध्यमातून गणेशोत्सवाचा उत्साह सर्जनशीलता आणि शिक्षणाच्या माध्यमातून जिवंत होतो. गणेशोत्सव हा ‘युवा’साठी केवळ सण नसून कल्पनाशक्ती, ज्ञान आणि एकत्रित आनंदाचा उत्सव आहे आणि मुले या आनंदसोहळ्याचा केंद्रबिंदू असतात.

        या वर्षी ‘युवा’चा हा उपक्रम महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, कर्नाटकसह विविध राज्यांतील ८० हून अधिक शाळांपर्यंत पोहोचला आणि उत्सवाचा आनंद सर्वत्र द्विगुणित करण्यात आला. कोल्हापुरातील न्यू मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कोलाज – नागाळा पार्क, श्री व्ही.जे. पाटील पब्लिक स्कूल – कांदळगाव, राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल – सायबर चौक, श्री वसंतराव चौगुले इंग्लिश मीडियम स्कूल, मोरेवाडी, संजीवन इंग्लिश मीडियम स्कूल – रंकाळा, लिटल नेमोनगर स्कूल या शाळांना भेट दिली. देशभरातील २४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने या उपक्रमात भाग घेतला आणि सुंदर कलाकृतींमधून गणरायाला सर्जनशील अभिवादन केले.

        ‘युवा स्टेशनरी’चे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर (सीएसओ) श्री. अभिजीत सान्याल म्हणाले : “सण ही आनंद, एकत्र येणे आणि शिकण्याची संधी असते, अशी ‘युवा’मध्ये आमची धारणा आहे. ‘माय बाप्पा सेलिब्रेशन’च्या उपक्रमातून आम्ही मुलांना सर्जनशीलता व्यक्त करण्यासाठी साधने आणि प्रेरणा देतो. तसेच सांस्कृतिक मूल्यांशी त्यांना जोडतो. आमचे प्रयत्न का महत्त्वाचे आहेत, हे त्यांच्या उत्साहातून आणि कलाकौशल्यातून आम्हाला नेहमीच उमगते.”

        ‘माय बाप्पा वर्कशॉप’ हा उपक्रम म्हणजे लहानग्यांच्या मनात सामूहिक समारंभाची भावना, सांस्कृतिक नाते आणि स्वतःला व्यक्त करण्याची ताकद जोपासण्याची बांधिलकी आहे. प्रत्येक सण हा मुलांसाठी शिकण्याचा आणि प्रगती साधण्याचा अर्थपूर्ण क्षण ठरावा, याची काळजी ‘युवा’तर्फे’कायम घेण्यात येतील.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In संस्कृतिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…