Home शैक्षणिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्तीसाठी 1 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्तीसाठी 1 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

9 second read
0
0
117

no images were found

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्तीसाठी 1 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

कोल्हापूर,  : अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत पुणे समाज कल्याण आयुक्तालयामार्फत राज्यातील अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययनासाठी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास 18 ऑगस्ट 2025 अखेर मुदत देण्यात आली होती. तथापि ही मुदत वाढवून 1 सप्टेंबर 2025 रोजी कार्यालयीन वेळेत सायं. 6.15 पर्यंत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी दिली आहे.

           या जाहिरातीस मुदतवाढ देण्यात आली असून https://fs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विहीत नमुन्यातील परिपूर्ण भरलेला अर्ज, वाचनीय व सुस्पष्ट कागदपत्रे ऑनलाईन सादर करावीत. यापूर्वी सन 2025-26 करीता अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसून ऑफलाईन नमुन्यात अर्जासोबत सुस्पष्ट प्रिंट समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयास 1 सप्टेंबर 2025 रोजी कार्यालयीन वेळेत सायंकाळी 6.15 पर्यंत सादर करावीत, असे आवाहन श्री. साळे यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

व्हेनेझुएलाच्या  कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी केली टाटा मोटर्सच्या नवीन ईलेक्ट्रिक वाहनांची पाहणी

व्हेनेझुएलाच्या  कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी केली टाटा मोटर्सच्य…