Home बँकिंग एचडीएफसी बँकने भारतजीपीटी निर्माते कोरोव्हरमध्ये केली गुंतवणूक

एचडीएफसी बँकने भारतजीपीटी निर्माते कोरोव्हरमध्ये केली गुंतवणूक

27 second read
0
0
100

no images were found

एचडीएफसी बँकने भारतजीपीटी निर्माते कोरोव्हरमध्ये केली गुंतवणूक

मुंबई,: भारतातील अग्रगण्य खाजगी क्षेत्रातील बँक एचडीएफसी बँकेने आज जाहीर केले की त्यांनी कोरोव्हर या आघाडीच्या संभाषणात्मक एआय कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. कोरोव्हरने भारतजीपीटीची निर्मिती केली आहे  एक अग्रगण्य, सार्वभौम आणि एंटरप्राइझ-ग्रेड मोठे भाषा मॉडेल (एलएलएम).

            कोरोव्हरकडे 1 अब्जांहून अधिक वापरकर्त्यांचा आधार आहे आणि 25,000 पेक्षा अधिक एंटरप्राइझेस व डेव्हलपर्स यांचा विश्वास आहे. कंपनी संभाषणात्मक एआय एजंट्स, एआय सहाय्यक (व्हिडिओबॉट, व्हॉइसबॉट, चॅटबॉट) आणि टेलिफोनी एआय सोल्युशन्स विकसित करते. ही सर्व सोल्युशन्स भारतजीपीटीवर आधारित आहेत, जे बहुभाषिक, मल्टीमोडल आणि डोमेन-अनुकूल असे एलएलएम आहे, जे पूर्णपणे भारतात, भारतासाठी विकसित केले गेले आहे.

      अरुप रक्षित,ग्रुप हेड ट्रेझरी,एचडीएफसी बँक म्हणाले, “भारतजीपीटीच्या विकासामुळे, जे भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशासाठी अनेक भारतीय भाषांमध्ये माहितीची देवाण-घेवाण सक्षम करते, कोरोव्हर आमच्यासाठी वेगळे ठरले.कोरोव्हरच्या स्थानिक भाषिक आवश्यकतांना पुरवणाऱ्या तज्ज्ञतेचे आम्ही कौतुक करतो. इंडिया एआय स्टार्टअप्स ग्लोबल अॅक्सेलरेटर प्रोग्राममध्ये कोरोव्हरद्वारे अर्थपूर्ण भूमिका बजावण्याचे आम्हाला अभिमान आहे.”

      अंकुश सभरवाल,संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी,कोरोव्हर म्हणाले,“भारतजीपीटीच्या विस्तार आणि प्रभाव वाढवण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये एचडीएफसी बँकेसह इतर गुंतवणूकदारांचा विश्वास व पाठिंबा मिळणे आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे. ही भागीदारी सार्वभौम,सुरक्षित, सर्वसमावेशक आणि भारतातील सर्वात महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये विस्तारक्षम अशा एआयची निर्मिती करण्याच्या सामायिक बांधिलकीचे प्रतीक आहे.”

      कोरोव्हरने भारत सरकारच्या धोरणात्मक प्रोत्साहनाची आणि इंडिया एआय मिशनसारख्या उपक्रमांची महत्त्वपूर्ण भूमिका मान्य केली आहे.यामुळे इंडिया एआय स्टार्टअप्स ग्लोबलसारख्या संधी उपलब्ध झाल्या आहेत,जे पॅरिसमधील स्टेशन एफ आणि एचईसी पॅरिस यांच्या सहकार्याने राबविण्यात येणारे एक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय अॅक्सेलरेशन प्रोग्राम आहे.

       कोरोव्हरचे स्वमालकीचे प्लॅटफॉर्म एंटरप्राइझेसना आवाज, व्हिडिओ आणि चॅटवर बुद्धिमान संभाषणात्मक एआय एजंट्स जलद गतीने तैनात करण्यास सक्षम करते. हे एजंट्स भारतजीपीटीच्या सखोल भाषिक समज, प्रादेशिक बोलींचा विविधतेचा समावेश आणि संदर्भसुसंगत अचूकतेसह कार्य करतात. कंपनीने नुकतेच भारतजीपीटी मिनी लाँच केले आहे, जे कमी क्षमतेच्या उपकरणांवर व इंटरनेटशिवाय (टेलिफोनी एआय) कार्य करू शकते, ज्यामुळे मर्यादित पायाभूत सुविधांमध्येही प्रवेशक्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In बँकिंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…