Home राष्ट्रीय केएमसी कॉलेजच्यावतीने हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन

केएमसी कॉलेजच्यावतीने हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन

7 second read
0
0
44

no images were found

केएमसी कॉलेजच्यावतीने हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण (केएमसी) कॉलेज एनसीसी विभागाच्यावतीने 78 व्या स्वतंत्र अमृतमहोत्सवा निमित्त 56 महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्यावतीने हर घर तिरंगा या रॅलीचे आयोजन करण्यात आले. हि रॅली धोत्री गल्ली, गंगावेश, पंचगंगा हॉस्पिटल या मार्गावर रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एन.उलपे, प्रा.रवींद्र मांगले, एनसीसी, एनएसएस, महाविद्यालयातील विद्यार्थी, एनसीसी ऑफिसर, एन.एस.एस.प्रकल्प अधिकारी, महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर व कर्मचाऱ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता.

            सदर रॅलीसाठी प्रशासक कै मंजूलक्ष्मी, 56 महाराष्ट्र बटालियन एनसीसी कमांडिंग ऑफिसर कर्नल पुनीत गोगिया, उपायुक्त कपिल जगताप, प्राचार्य डॉ.बी.एन.उलपे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे नियोजन कॅप्टन डॉ अमित रेडेकर, प्रा.एसटी धुर्वे, प्रा.रविंद्र मांगले, प्रा.एस.पी.कांबळे, प्रा.किरण भोसले, प्रा.युवराज मोटे, प्रा.राम पवार यांनी केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राष्ट्रीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…