no images were found
अदानी ग्रीन एनर्जीची ऊर्जा विक्री Q1 FY26 मध्ये 42% नी वाढली; आर्थिकदृष्ट्या ठोस कामगिरी कायम
ऑपरेशनल क्षमतेत 45% वाढ; भारतातील सर्वात मोठी नवीकरणीय ऊर्जा कंपनी म्हणून अग्रस्थानी कायम
Q1 FY26 मध्ये 1.6 GW ग्रीनफील्ड प्रकल्पांची वाढ; मागील वर्षात 4.9 GW वाढ – भारताच्या ऊर्जा संक्रमणात ऐतिहासिक टप्पा
FTSE Russell ESG स्कोअरमध्ये ‘अल्टरनेटिव्ह इलेक्ट्रिसिटी’ उपविभागात जागतिक क्रमांक १
अहवालातील ठळक बाबी:
ऊर्जा विक्री: मागील वर्षीच्या तुलनेत 42% वाढ होऊन 10,479 मिलियन युनिट्स विक्री (Q1 FY26 मध्ये एकट्याच वर्ष 2022च्या एकूण विक्रीपेक्षा अधिक)
महसूल: 31% वाढ होऊन ₹3,312 कोटी
EBITDA: 31% वाढ होऊन ₹3,108 कोटी; EBITDA मार्जिन – 92.8%
रोख नफा: 25% वाढ होऊन ₹1,744 कोटी
अहमदाबाद, 29 जुलै 2025: अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL) ही भारतातील सर्वात मोठी व जलद गतीने वाढणारी नवीकरणीय ऊर्जा कंपनी आहे. कंपनीने 30 जून 2025 अखेरच्या तिमाहीसाठी (Q1 FY26) उत्कृष्ट आर्थिक व कार्यप्रदर्शनासह निकाल जाहीर केले आहेत.
प्रमुख आर्थिक निकाल – Q1 FY26
महत्त्वाची कारणे:
· ग्रीनफील्ड प्रकल्पांत 4.9 GW ची वाढ
· आधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च कार्यक्षमतेच्या प्रकल्पांची अंमलबजावणी
· गुजरातमधील खावडा व राजस्थानमधील समृद्ध ऊर्जा स्थळांवरील प्रकल्पांचे योगदान
अशिष खन्ना (CEO, AGEL) म्हणाले, “Q1 FY26 मध्ये आम्ही 1.6 GW नवीन ग्रीनफील्ड क्षमतेची भर घातली. मागील वर्षभरात 4.9 GW ची वृद्धी झाली आहे, जी भारताच्या स्वच्छ ऊर्जेकडे होणाऱ्या संक्रमणातील मोठा मैलाचा दगड आहे. आमचा 2030 पर्यंत 50 GW क्षमतेचा लक्ष्य ठाम आहे, ज्यात हायड्रो-पंप्ड स्टोरेज व बॅटरी स्टोरेज यांचाही समावेश असेल.”
क्षमता वाढ आणि कार्यप्रदर्शन – Q1 FY26:
· प्रकल्प विकासातील उत्कृष्टता:
AGEL ने प्रगत संसाधन नियोजन, अभियांत्रिकी आणि पुरवठा साखळी व्यवस्थापनाच्या मदतीने आपल्या ग्रीनफिल्ड क्षमतांमध्ये सातत्याने वाढ केली आहे. या वाढीच्या प्रक्रियेत प्रकल्प व्यवस्थापन, अंमलबजावणी आणि गुणवत्ता हमी यासाठी आमचे भागीदार Adani Infra India Ltd (AIIL) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
· कार्यक्षम क्षमता: वार्षिक तुलनेत AGEL ची कार्यक्षम क्षमता उल्लेखनीय 45% नी वाढून 15.8 GW झाली असून, यामुळे 50 GW क्षमतेचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने आमची ठाम वाटचाल सुरू आहे.
मागील एक वर्षात झालेल्या ग्रीनफिल्ड क्षमतेतील वाढीत एकूण 3,763 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पांचा समावेश होता, ज्यामध्ये गुजरातमधील खावडा येथे 2,463 मेगावॅट, राजस्थानमध्ये 1,050 मेगावॅट आणि आंध्र प्रदेशमध्ये 250 मेगावॅट सौर क्षमतेचा समावेश होता. याशिवाय, खावडा येथे 585 मेगावॅट वाऱ्याच्या ऊर्जा क्षमतेची आणि 534 मेगावॅट सौर-वाऱ्याच्या संमिश्र क्षमतेची भर घालण्यात आली.
· ऊर्जाविक्री: मजबूत क्षमतेतील वाढ आणि उत्कृष्ट कार्यप्रदर्शन यांच्या जोरावर ऊर्जा विक्रीत वार्षिक 42% नी वाढ झाली आहे..