no images were found
कौटुंबिक विनोदी मालिका ‘घरवाली पेडवाली’मध्ये प्रियमवदा कांत लतिकाच्या भूमिकेत!
मालिका ‘घरवाली पेडवाली’ अलौकिक शक्तीसंदर्भातील गोंधळाचा आनंद देते, जेथे प्रेक्षकांना अद्वितीय मनोरंजनाचा अनुभव मिळेल. या विलक्षण कथानकामधील प्रमुख पात्र आहे पेडवाली (प्रियमवदा कांतने साकारलेली भूमिका), जी गतकाळातील खोडकर आत्मा आहे आणि अनपेक्षितपणे आजच्या युगामध्ये परत आली आहे. अभिनेत्री मालिकेमधील प्रमुख नायक जीतू शर्माच्या अज्ञात पत्नीची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. प्रियमवदा कांत या विनोदी, मोहक आणि उत्साहवर्धक असमकालीन भूमिकेसह टेलिव्हिजनवर बहुप्रतिक्षित पुनरागमन करत आहे.
लतिका (पेडवाली)च्या भूमिकेबाबत सांगताना प्रियमवदा कांत म्हणाली, ”लतिका फक्त आणखी एक भूमिका नाही तर मालिका ‘घरवाली पेडवाली’चा भावनिक व कथात्मक गाभा आहे. तिची उपस्थिती कथानकाला रोमांचक वळण देते आणि मला अशा नवीन व मूळ थीम असलेल्या मालिकेचा भाग होण्याचा आनंद होत आहे. भारतीय टेलिव्हिजनवर अलौकिक शक्तीबाबत विनोदी शैली क्वचितच पाहायला मिळते आणि याच गोष्टीने माझे लक्ष वेधून घेतले. लतिका उत्साही, विनोदी आहे आणि तिच्यामध्ये विलक्षणता आहे, ज्यामुळे ही भूमिका साकारताना खूप धमाल येते. मला नेहमी विनोदी शैली आवडते आणि त्यामध्ये मी निपुण आहे असा माझा विश्वास आहे. म्हणून या भूमिकेसह माझी दीर्घकाळापासूनची इच्छा पूर्ण झाली आहे असे वाटते.” ती पुढे म्हणाली, ”मी लतिकाच्या उत्साही स्वभावामध्ये पूर्णपणे सामावून गेले आहे, मला वास्तविक जीवनात देखील इतरांची मस्करी करायला आवडते. या मालिकेबाबत मला आवडलेली बाब म्हणजे विनोद, हृदयस्पर्शी क्षण, लहान शहरांची मोहकता आणि अस्सल देसी स्वादाचे परिपूर्ण संतुलन.”