Home निसर्ग न्यू वुमेन्स कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये जागतिक निसर्ग संवर्धन दिन उत्साहात संपन्न 

न्यू वुमेन्स कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये जागतिक निसर्ग संवर्धन दिन उत्साहात संपन्न 

6 second read
0
1
55

no images were found

न्यू वुमेन्स कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये जागतिक निसर्ग संवर्धन दिन उत्साहात संपन्न 

 

कोल्हापूर (प्रतिनिधी):येथील, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचालित,न्यू वुमेन्स कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये जागतिक निसर्ग संवर्धन दिन उत्साहात संपन्न झाला. दरवर्षी 28 जुलै रोजी जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा केला जातो. हा दिवस निसर्ग आणि पर्यावरणाचे महत्त्व दर्शवतो. स्वच्छ पर्यावरण हा निरोगी आणि स्थिर मानवी समाजाचा पाया आहे हे मान्य करण्यासाठी या दिवशी जगभरात विशेष जनजागृती मोहिमेचे आयोजन केले जाते. निसर्गाचे रक्षण करणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयांध्ये दुर्मिळ औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले व संवर्धन करण्याची शपथ घेण्यात आली. या औषधी वनस्पती द्वितीय वर्षांच्या विद्यार्थिनींनी महाविद्यालयास भेट दिल्या. यावेळी विद्यार्थिनींनी पोस्टर द्वारे प्रबोधन केले. 

       यासाठी प्रा. निकिता शेटे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ.रविंद्र कुंभार, चेअरमन श्री.डॉ. के. जी. पाटील, आजीव सेवक श्री. उदय पाटील यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In निसर्ग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…