Home आरोग्य जिल्हा एड्स नियंत्रण विभागामार्फत ‘रेड रन’ मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

जिल्हा एड्स नियंत्रण विभागामार्फत ‘रेड रन’ मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

6 second read
0
0
153

no images were found

जिल्हा एड्स नियंत्रण विभागामार्फत ‘रेड रन’ मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

 

कोल्हापूर, : आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, सी.पी.आर. हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या वतीने गुरुवार, दि. 31 जुलै रोजी सकाळी 8:00 वाजता दसरा चौक, कोल्हापूर येथून ‘रेड रन’ मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या स्पर्धेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह जास्तीत जास्त नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन एड्स नियंत्रणासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी केले आहे.

 

ही स्पर्धा कोल्हापूर जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असून ती पुरुष आणि महिला अशा दोन गटांमध्ये होईल. स्पर्धेत प्रथम क्रमांकाला 2,000 रुपये, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांकाला 1,500 रुपये, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र, तर तृतीय क्रमांकाला 1,000 रुपये, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र अशी बक्षीसे दिली जातील. स्पर्धा वेळेवर सुरू होईल.

 

स्पर्धकांनी https://forms.gle/iqsyqJQg4aPgtXw37 या लिंकवर नोंदणी करावी आणि स्पर्धेआधी एक तास उपस्थित राहून नोंदणी पडताळणी करावी. स्पर्धक कोल्हापूर जिल्ह्यातील महाविद्यालयाचा विद्यार्थी असावा, वय 17 ते 25 वर्षे असावे, तसेच महाविद्यालयीन ओळखपत्र आणि आधार कार्ड सोबत बाळगणे आवश्यक आहे. स्पर्धेचे अंतर मुलांसाठी 5 किमी आणि मुलींसाठी 3 किमी असेल. विद्यार्थ्यांनी शारीरिक तंदुरुस्तीची खात्री करून स्पर्धेत सहभागी व्हावे. संयोजक आणि परीक्षक यांचा निर्णय अंतिम राहील. प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठवले जाईल.

 अधिक माहितीसाठी कपिल मुळे (9767897414), विनायक देसाई (9421106260) किंवा संदीप पाटील (9730652222) यांच्याशी संपर्क साधावा.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक कोल्हापूर : …