no images were found
हिंदूंच्या सुरक्षितेतसाठी आपत्कालीन संपर्क यंत्रणा निर्माण करण्याचा निर्धार ! – शाहूपुरी येथील राधाकृष्ण मंदिरात हिंदु राष्ट्र समन्वय समितीची बैठक
कोल्हापूर(प्रतिनिधी ):- सध्याची एकूण स्थिती पहाता विविध ठिकाणी, हिंदूंचे उत्सव यांवर आघात होत आहेत. एखादा हिंदू संकटात असेल, तर त्याला प्रत्येक वेळी साहाय्य मिळतेच असे नाही. त्यासाठी हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी आपत्कालीन संपर्क यंत्रणा निर्माण करणे आणि प्रत्येक हिंदूंच्या रक्षणसाठी प्रयत्नशील रहाणे याचा निर्धार हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या बैठकीत करण्यात आला. हा निर्धार २१ जुलैला राधाकृष्ण मंदिर येथे झालेल्या बैठकीत करण्यात आला. येणार्या गणेशोत्सव श्री गणेशमूर्ती विर्सजनास अनुमती देण्यात यावी, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु राष्ट्र संपर्क अभियान राबवण्याचा निर्धारही या प्रसंगी करण्यात आला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला, तर मंदिर महासंघाचे श्री. प्रसाद कुलकर्णी यांनी पुढे करावयाच्या कृतींविषयी माहिती दिली.
३२ शिराळा येथील नागपंचमीमध्ये सध्या जिवंत नागाच्या पूजनावर बंदी असून ती उठवण्याच्या संदर्भात शासन पातळीवर निवेदन देणे, पंचगंगा प्रदूषणमुक्तीचा लढा उभा करणे यांसह अन्य सूत्रांवर कार्य करण्याचा निर्धार करण्यात आला. या बैठकीत हिंदू एकता आंदोलनाचे प्रांत उपाध्यक्ष श्री. दिलीप भिवटे, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे करवीर तालुका संयोजक श्री. शरद माळी, हिंदू युवा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. अशोक देसाई, वीर शिवा काशीद यांचे वंशज श्री. आनंदराव काशीद यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
या बैठकीसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थाचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, हिंदू महासभा महिला आघाडीप्रमुख शीला माने, रश्मी साळोखे, शंकराचार्य मठाचे प्रतिनिधी श्री. शिवस्वरूप भेंडे, श्रीकृष्ण न्यासाचे राष्ट्रीय सदस्य श्री. पराग फडणीस, विश्व हिंदु परिषदचे जिल्हामंत्री श्री. विजयकुमार पाटील, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, मराठा तितुका मेळावावाचे श्री. योगेश केरकर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सर्वश्री प्रमोद सावंत, अशोक गुरव, आप्पासाहेब गुरव, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, अखिल भारत हिंदू महासभेचे श्री. संदीप सासने, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री अशोक रामचंदानी, किरण कुलकर्णी, कैलास दीक्षित, नितीन काकडे, घन:शामभाई पटेल, हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र तोरस्कर, शिवशाही प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. सुनील सामंत, हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेंद्र अहिरे उपस्थित होते.