Home उद्योग स्‍कोडा ऑटोने भारतात गाठला ३०० ग्राहक टचपॉइण्‍ट्सचा टप्‍पा

स्‍कोडा ऑटोने भारतात गाठला ३०० ग्राहक टचपॉइण्‍ट्सचा टप्‍पा

1 min read
0
0
28

no images were found

स्‍कोडा ऑटोने भारतात गाठला ३०० ग्राहक टचपॉइण्‍ट्सचा टप्‍पा

 

कोल्हापूर,  : स्‍कोडा ऑटो नवीन स्‍तरावर झेप घेत आहे, जेथे भारतात २५ वर्षांचा वारसा आणि जागतिक स्‍तरावर १३० वर्षे साजरी करत आहे. या महिन्‍या च्‍या सुरूवातीला ब्रँडने २०२५ च्‍या पहिल्‍या सहामाहीत आतापर्यंतची सर्वोच्‍च सहामाही विक्री संपादित केली. आणखी एका यशामध्‍ये कंपनीने ३०० ग्राहक टचपॉइण्ट्सचा टप्‍पा पार केला आहे, जेथे भारतातील १७२ शहरांमधील ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करत आहे. स्‍कोडा ऑटोच्‍या भारतातील विकास धोरणामध्‍ये अद्वितीय ग्राहक अनुभव महत्त्वाचा आहे. झपाट्याने होत असलेल्‍या नेटवर्क विस्‍तारीकरणामधून ही बाब दिसून येते, तसेच प्रबळ गतीसह ब्रँड भारतभरात आपली उपस्थिती दृढ करत आहे.

     या यशाबाबत मत व्‍यक्‍त करत स्‍कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक आशिष गुप्‍ता म्‍हणाले, ”आमचे वाढते नेटवर्क आमच्‍या उत्‍पादन श्रेणीला ग्राहकांसाठी अधिक सहजसाध्य करते, तसेच देशभरात सातत्‍यपूर्ण दर्जासह स्‍मार्टपणे, गतीशीलपणे सर्विस देते. ‘सहयोगाने विकास आणि ग्राहकांच्‍या जवळ पोहोचणे’ यावर प्रबळ भर देत भारतातील स्‍कोडा ऑटोच्‍या दीर्घकालीन डीलर सहयोगींनी आमच्‍या विस्‍तारीकरणामध्‍ये मोठे योगदान दिले आहे, तसेच ग्राहक केंद्रित्वाचा प्रमाणित ट्रॅक रेकॉर्ड असलेल्‍या नवीन सहयोगी देखील येत आहेत. हे विस्‍तारीकरण भारतातील स्‍कोडा ऑटोचा वारसा दृढ करण्‍याच्‍या, तसेच सुरक्षितता, मूल्‍य आणि मालकीहक्‍क अनुभवाला लाभदायी करण्‍याचे आमचे वचन कायम ठेवण्‍याच्‍या दिशेने पुढाकार आहे.”

     कायलॅक भारतातील स्‍कोडा ऑटोच्‍या विकासासाठी प्रमुख स्रोत आहे, जेथे ही कार नवीन बाजारपेठांमधील नवीन ग्राहकांवर लक्ष्‍य करते आणि ब्रँडच्‍या नेटवर्क विस्‍तारीकरणासह या बाजारपेठांमधील गरजांची पूर्तता केली जात आहे. कुशक व कोडियकसह स्‍कोडा ऑटो इंडियाकडे आता प्रत्‍येकासाठी एसयूव्‍ही आहे. स्‍लाव्हियाने स्‍कोडा ऑटोचा भारतातील सेदान वारसा कायम ठेवला आहे, तसेच लवकरच देशामध्‍ये जागतिक आयकॉन लॉंच करण्‍यात येणार आहे. वाढते नेटवर्क भारतातील स्‍कोडा ऑटोच्‍या उत्‍पादन धोरणाशी संलग्‍न आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…