Home मनोरंजन शरद केळकर आणि निहारिका चौक्सी यांच्या ‘तुम से तुम तक’ साठी जावेद अली आणि पलक मुच्छल यांचे भावस्पर्शी शीर्षकगीत!

शरद केळकर आणि निहारिका चौक्सी यांच्या ‘तुम से तुम तक’ साठी जावेद अली आणि पलक मुच्छल यांचे भावस्पर्शी शीर्षकगीत!

48 second read
0
0
70

no images were found

शरद केळकर आणि निहारिका चौक्सी यांच्या ‘तुम से तुम तक’ साठी जावेद अली आणि पलक मुच्छल यांचे भावस्पर्शी शीर्षकगीत!

कथाकथनामध्ये झी टीव्ही ही नेहमीच अग्रगण्य राहिली असून सामाजिक नियमांना आव्हान देणारी आणि नात्यांची पुनर्व्याख्या करणारी अशी विचार करण्यासाठी उद्युक्त करणारी कथानके सांगण्यात ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. आपली नवीन मालिका तुम से तुम तक च्या माध्यमातून ही वाहिनी पारंपरिक अपेक्षांच्या पलीकडे जाण्याचे धाडस करणारी एक ताजेपणा आणि भावनिकतेने भरलेली प्रेमकहाणी सादर करत आहे. या मालिकेतील प्रमुख कलाकारांची – शरद केळकरची धीरगंभीर आणि आकर्षक आर्यवर्धन म्हणून आणि निहारिका चौक्सी यांची हसरी खेळकर आणि कोमल हृदय असलेली अनु म्हणून – घोषणा झाल्यानंतर वाहिनीने आता मालिकेच्या आकर्षक शीर्षक गीत आणि म्युझिक व्हिडीओच्या लाँचसह प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

शरद केळकर आणि निहारिका चौक्सी ही प्रमुख जोडी म्हणून घोषित केल्यानंतर — शांत, समंजस आणि परिपक्व आर्यवर्धनच्या भूमिकेत शरद, तर उत्साही आणि मनमिळावू अनुच्या भूमिकेत निहारिका — आता झी टीव्ही या मालिकेच्या शीर्षक गीत आणि म्युझिक व्हिडीओच्या प्रकाशनामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढवत आहे. ‘तुम से तुम तक’ या मालिकेत हे गाणे एक वेगळीच भावनिक खोली निर्माण करते, ज्यातून अनु आणि आर्यवर्धनच्या प्रेमकथेची एक झलक प्रेक्षकांना मिळते. प्रसिद्ध गायक जावेद अली आणि पलक मुच्छल यांच्या हृदयस्पर्शी आवाजात सादर झालेले हे गीत आपल्या अर्थपूर्ण शब्दांनी आणि आत्म्याला भिडणाऱ्या संगीताने मालिकेचा गाभा सादर करतो. व्हिडीओमध्ये शरद आणि निहारिका यांच्यातली केमिस्ट्री त्यांच्या कथेबाबतच्या उत्सुकतेत आणखी भर टाकते.

हेच नव्हे तर शरदसाठी, हा अनेक वर्षांनंतर टेलिव्हिजनसाठी केलेला पहिला म्युझिक व्हिडीओ आहे — आणि तो अनुभव तो “भव्य, जादुई आणि भावनिकदृष्ट्या प्रभावी” असा सांगतो. निहारिकासाठी हा तिचा पहिलाच म्युझिक व्हिडीओ असल्यामुळे, हा प्रोजेक्ट तिच्यासाठी एक विशेष टप्पा ठरतो, जो वैयक्तिक उत्साहाचे प्रतिक आहे.

शरद केळकर म्हणाला, या इंडस्ट्रीत अनेक वर्षांनंतर मी टेलिव्हिजन शोसाठी माझा पहिला म्युझिक व्हिडीओ शूट केला आणि हा एक अतिशय सुंदर अनुभव होता. माझा खास मित्र सिद्धार्थने हा व्हिडीओ दिग्दर्शित केला आहे आणि तो अत्यंत प्रतिभावान देवांगने कोरिओग्राफ केला आहे. जेव्हा तुमच्यासोबत एक जिंदादिल आणि प्रतिभावान टीम असतेतेव्हा संपूर्ण प्रक्रिया अधिक सुंदर होते. झी टीव्हीच्या टीमने जी संकल्पना विचारात घेतलीती एखाद्या स्वप्नासारखी आणि जादुई होती – टेलिव्हिजनवर असं काही फार कमी पाहायला मिळतं. गाणं अतिशय सुंदर आणि भावनिक आहे. जावेद अली आणि पलक मुच्छलने कमाल गायन केलं आहे – त्यांच्या आवाजात जी भावना आहेती या गाण्याला वेगळाच स्पर्श देते. मला खरंच वाटतं की हे गाणं या वर्षातील लव्ह अँथम’ ठरू शकतं. आम्हाला हे गाणं बनवताना जेवढा आनंद मिळालातितकंच प्रेम प्रेक्षकांनीही त्यावर करावंहीच अपेक्षा.

निहारिका चौक्सी म्हणाली, माझा पहिला म्युझिक व्हिडीओ शूट करणे हा अनुभव कायम लक्षात राहील. ज्या क्षणी मी सेटवर पाऊल ठेवलेतेव्हा असे वाटले की जणू मी एखादं स्वप्न पाहते आहे. लाईटिंगपासून सेट डिझाइनपर्यंत प्रत्येक गोष्टीवर इतकी बारकाईने काम केलं गेलं होतं कीसंपूर्ण वातावरण जादूई वाटत होतं. या गाण्यात खूप भावनिक सखोलता आहे आणि त्याची गोडी शूट संपल्यानंतरही मनात रेंगाळली. हा माझा पहिलाच म्युझिक व्हिडीओ असल्यामुळेतो केवळ दिसायला सुंदरच नाही तर संगीताच्या दृष्टीनेही अतिशय खास आहे. आम्ही ज्या प्रेमाने आणि मेहनतीने ही गोष्ट बनवली आहेती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.

पलक मुच्छल म्हणाली, हे गाणे रेकॉर्ड करताना मला खूप आनंद झाला — हे एक सुंदरआत्म्याला भिडणारे सुमधुर गीत आहे जे अनु आणि आर्यवर्धनच्या प्रेमकथेचे सार अगदी अचूकपणे उलगडते. मी याआधीही जावेद भैय्यासोबत अनेक गाणी केली आहेत आणि खरं सांगायचं तर ते एक अतिशय प्रतिभावान गायक आहेत. आमची युगल गाणी नेहमीच प्रेक्षकांनी आवडीने ऐकली आहेत आणि आम्हांला आशा आहे की हे गाणे देखील तितकेच भावेल. तुम से तुम तकचं शीर्षकगीत गाताना मला खरंच असं वाटलं की हे गाणे जणू माझ्यासाठीच तयार झाले आहे. मी तुम से तुम तकच्या संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा देते आणि आशा करते की प्रेक्षकांकडून या मालिकेला भरभरून प्रेम मिळो.

जावेद अली म्हणाला, हे गाणे ऐकताक्षणीच माझ्या मनाला भिडले आणि मला विश्वास आहे की हे ऐकणाऱ्या प्रत्येकालाच तसेच वाटेल. हे गाणे रेकॉर्ड करताना मला खूप आनंद झाला आणि अशा सुंदर प्रोजेक्टचा भाग बनणे माझ्यासाठी भाग्याचे होते. गाणे सुरू करण्याआधीच मी त्याच्याशी भावनिक पातळीवर जोडलेलो होतो आणि मला खात्री आहे की ही भावना माझ्या आवाजातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. तुम से तुम तकच्या संपूर्ण टीमला माझ्या शुभेच्छा – मालिकेचे नाव खूप सुमधुर आणि लक्षात राहणारे आहे. अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा टीव्ही मालिकेसाठी शीर्षकगीत गाण्याची संधी मिळाल्याने मला खूप आनंद वाटला.

जावेद अली आणि पलक मुच्छल यांच्या आत्म्याला भिडणाऱ्या गायनाने या मालिकेच्या गाभ्याला साजेसे असे भावनिक वातावरण तयार केले आहे आणि शीर्षक गीताचा म्युझिक व्हिडीओ पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच वाढली आहे. आता खरी जादू लवकरच उलगडणार आहे कारण तुम से तुम तक’ लवकरच झी टीव्हीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही कथा अनु आणि आर्यवर्धन यांच्या रूढींच्या सीमारेषा ओलांडणाऱ्या प्रेमकथेची आहे — एक अशी भावनिक सफर जी समाजाच्या पारंपरिक चौकटींना आव्हान देणारी ठरेल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…