no images were found
लॉरिट्झ नूडसन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशनने त्यांचा सर्वात महत्त्वाकांक्षी उत्पादन पोर्टफोलिओ केला लाँच
डीप इंडियामध्ये तंत्रज्ञान प्रवेश वाढवण्यासाठी आणि संधींचा विस्तार करण्यासाठी उच्च-प्रभावी उद्योग सहकार्याद्वारे हे एक धाडसी धोरण आहे
· 30 शहरांच्या ‘तंत्रज्ञान दौऱ्या’ला सुरुवात होत आहे जिथे भविष्यासाठी 10हून अधिक पर्याय तयार ठेवणे, जागरूकता वाढवणे, प्रवेश तसेच स्वीकृती मोठ्या प्रमाणात दाखवली जाईल.
· स्थानिक गरजांनुसार तयार केलेल्या भारताच्या औद्योगिक क्लस्टर्ससाठी विभागवार नवोपक्रमांचे उद्दिष्ट आहे.
· स्मार्ट ऑटोमेशनसह भारताच्या डिजिटल कणा अधिक बळकट करण्यासाठी वचनबद्ध.
नवी दिल्ली,27 जून 2025 – देशातील प्रमुख औद्योगिक क्लस्टर्स आणि ग्रोथ कॉरिडॉरना पाठबळ देण्याच्या उद्देशाने भारतीय इलेक्ट्रिकल आणि ऑटोमेशन क्षेत्रातील आघाडीची कंपनी लॉरिट्झ नूडसन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशनने आज त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या उत्पादन पोर्टफोलिओचे अनावरण केले. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा एक भाग म्हणून, ब्रँड देशातील ३० औद्योगिक शहरांमध्ये फिरून भारतातील उत्पादन आणि पायाभूत सुविधा केंद्रांच्या मध्यभागी तंत्रज्ञानाचा अवलंब वाढविण्यासाठी स्थानिक नेते, भागधारक आणि इकोसिस्टम भागीदारांशी संवाद साधत आहे.
कमी-व्होल्टेज, औद्योगिक ऑटोमेशन आणि नवीन ऊर्जा लँडस्केपसाठी आवश्यक उपायांवर लक्ष केंद्रित करून, लॉरिट्झ नूडसेन तंत्रज्ञानावर आधारित परिवर्तन घडवत आहे जे भारताच्या औद्योगिक केंद्रांपर्यंत पोहोचते. ही ऐतिहासिक मोहीम सरकारच्या विकसित भारत 2047च्या दृष्टिकोनाशी सुसंगत असून, तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत, आर्थिकदृष्ट्या लवचिक आणि एनर्जी-स्मार्ट भारत निर्माण करण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते.
“ग्राहकांना सुरक्षित, जलद आणि स्मार्ट काम करण्यास सक्षम बनवणाऱ्या स्मार्ट तंत्रज्ञानाचा पुरवठा करणे हा आमचा उद्देश आहे. या पोर्टफोलिओद्वारे, आम्ही नव्याने सुरू केलेले उपक्रम हा भारतातील प्रत्येकासाठी सुलभ आणि त्यांच्याशी जोडलेले असले पाहिजेत, याची काळजी घेतो. रायपूरमधील भात गिरणीचे स्वयंचलितकरण असो, कोइम्बतूरमधील कापड गिरणीला वीजपुरवठा असो किंवा पुण्यातील प्लांटचे आधुनिकीकरण असो, आमचा पोर्टफोलिओ प्रभावासाठी डिझाइन केलेला आहे,” असे लॉरिट्झ नूडसेन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशनचे सीओओ नरेश कुमार म्हणाले.
2029 पर्यंत भारतातील विद्युत उपकरण क्षेत्र 95 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढेल आणि 2033पर्यंत औद्योगिक ऑटोमेशन 39.65 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. 1. भारतीय उत्पादक आधीच त्यांच्या ऑपरेटिंग बजेटपैकी 35% टेक्नॉलॉजी मॉडर्नायझेशनमध्ये गुंतवत आहेत – हे जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे. हे बदल केवळ संख्यात्मक नाहीत; तर ते अधिक स्मार्ट, अधिक कार्यक्षम प्रणालींसाठी देशव्यापी मोहिमेचे प्रतिबिंब आहेत. 2047च्या विकसित भारत दृष्टिकोनाशी जुळवून घेत, आम्ही केवळ उत्पादने लाँच करत नाही – तर स्मार्ट, स्वच्छ आणि भविष्यासाठी भारताला संक्रमण सक्षम करत आहोत,” असे ते पुढे म्हणाले.
प्रमुख लाँच –
सर्वसमावेशक ईव्ही चार्जिंग इकोसिस्टम – ईव्ही चार्जर्स, एक केंद्रीकृत चार्ज व्यवस्थापन प्रणाली (सीएमएस) आणि क्लाउड-आधारित ग्राहक अनुप्रयोगांचा समावेश असलेली ही इकोसिस्टम इंटलिजन्ट एनर्जी वितरण आणि ग्राहक-केंद्रित डिजिटल इंटरफेससह इलेक्ट्रिक मोबिलिटीकडील संक्रमणास समर्थन देते.
प्रगत, अंतर्ज्ञानी आणि डिजिटल पॉवर डिस्ट्रिब्युशन आर्किटेक्चर ज्यात :
न्यू-एज एअर सर्किट ब्रेकर्स आणि हाय-परफॉर्मन्स मोल्डेड केस सर्किट ब्रेकर्स (MCCBs), यात अत्याधुनिक स्विचिंग आणि संरक्षण क्षमता आहे, विविध प्रयोग आणि डिजिटल आर्किटेक्चर प्लॅटफॉर्ममध्ये अखंड एकात्मतेसाठी डिझाइन केलेले.
एंड-टू-एंड इंडस्ट्रियल ऑटोमेशन सोल्युशन्स – स्मार्टकॉम आयओटी-सक्षम सॉफ्टवेअर सूटद्वारे समर्थित, डिस्क्रिट प्रोसेस ऑटोमेशन वाढविण्यासाठी डिझाइन केलेले व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राइव्ह, पीएलसी आणि एचएमआयचा एक नवीन पोर्टफोलिओ.
स्मार्ट न्यूमेरिकल प्रोटेक्शन रिले – एलव्ही आणि एमव्ही दोन्ही सिस्टमसाठी व्यापक संरक्षण, नियंत्रण आणि योग्य कम्युनिकेशन देणे
दशकांच्या तज्ज्ञतेच्या आधारावर, लॉरिट्झ नूडसेनच्या नवनवीन ऑफर भारताच्या प्रादेशिक विविधतेचे, राज्य-विशिष्ट धोरणांचे आणि क्षेत्रीय प्राधान्यांचे सखोल आकलन करून तयार केल्या आहेत. त्यांच्या व्यापक विस्ताराचा एक भाग म्हणून, कंपनी भारतातील सर्वात गतिमान औद्योगिक आणि मायक्रो – मार्केट समूहांना लक्ष्य करून पुणे आणि नोएडा ते भुवनेश्वर, कोइम्बतूर तसेच गुवाहाटी अशा 30 हून अधिक शहरांमध्ये त्यांचे नवोपक्रम आणत आहे.
लॉरिट्झ नूडसेन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन हे केवळ तंत्रज्ञान प्रदाते नाहीत, तर त्यापेक्षाही अधिक आहेत. समावेशक, शाश्वत भविष्यासाठी तयार करण्यासाठी ते एक धोरणात्मक नेतृत्व आहे. जे स्वावलंबी आणि जागतिक नेतृत्वाच्या दिशेने भारताच्या प्रवासाला बळकटी देते. उद्योग नेते, सिस्टम इंटिग्रेटर, अभियंते, कंत्राटदार आणि धोरण ठरवणाऱ्यांसोबत उत्तम संबंध आणि भागधारकांच्या सहभागाद्वारे, कंपनीचे उपाय राष्ट्रीय प्राधान्यांना थेट कसे समर्थन देतात हे ब्रँड दाखवून देईल. मग ते स्वच्छ ऊर्जा, कृषी-कार्यक्षमता किंवा औद्योगिक आधुनिकीकरण…कशातीलही असो.