Home व्यापार कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या वतीने उद्या कार्यशाळा

कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या वतीने उद्या कार्यशाळा

4 second read
0
0
63

no images were found

कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या वतीने उद्या कार्यशाळा

 

कोल्हापूर, (प्रतिनिधी):– कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या वतीने मंगळवारी (ता. १७) व्यावसायिक कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

     कोल्हापूर सराफ व्यापारी संघ व आयआयजेएसच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल झोरबा येथे मंगळवारी सायंकाळी सात वाजता होणाऱ्या या कार्यशाळेमध्ये ३० जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत मुंबई येथे होणाऱ्या प्रदर्शनासंबंधी सौ. नाहीद सुनके माहिती देतील. यावेळी नोंदणीही केली जाईल. मिथिलेश पांडे जीजेईपीसी व व्यावसायिक संधींवर मार्गदर्शन करतील. यामध्ये व्यवसाय वाढ, ग्राहकांची आवड निवड, भाववाढीतून व्यवसाय, जाहिरात, भांडवल कसे उभे करायचे, इम्पोर्ट-एक्स्पोर्टद्वारे व्यवसाय वाढविणे आदी गोष्टींवर मार्गदर्शन करणार आहेत. डायमंड उद्योगावर इंडियन नॅचरल डायमंड रिटेलर अलायन्सचे श्री. मुलरी मार्गदर्शन करणार आहेत. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने या कार्यशाळेला सराफ व्यावसायिक व सुवर्णकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष राजेश राठोड, उपाध्यक्ष विजय हावळ, सचिव शिवाजी पाटील, प्रीतम ओसवाल यांच्यासह संचालक मंडळाने केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In व्यापार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…