
no images were found
श्रीराम फ़ार्म सोल्युशन्स ची नवीन विशेष वनस्पती पोषण आणि पीक संरक्षण उत्पादने बाजारात
राष्ट्रीय,: डीसीएम श्रीराम लिमिटेडच्या विभाग असलेल्या श्रीराम फ़ार्म सोल्युशन्स ने त्यांची नव्या युगातील विशेष वनस्पती पोषण उत्पादने लॉन्च केली, तसेच अलीकडच्या काळात सुरू केलेल्या श्रीराम क्रॉप प्रोटेक्शन आणि बियाणे उत्पादनांद्वारे शेतकऱ्यांच्या यशोगाथा ही शेअर केल्या. हा भव्य कार्यक्रम महाराष्ट्रातील पुणे येथील “हॉटेल हयात” मध्ये पार पडला., जिथे या प्रदेशातील प्रमुख चॅनल पार्टनर्स एकत्र आले होते आणि या नाविन्यपूर्ण सोल्युशन्सच्या उत्साहपूर्ण लॉन्चचा साक्षीदार झाले. इतकंच नव्हे तर, ६० हून अधिक वितरकांनी विविध व्यवसाय क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वितरकांचा गौरव करणाऱ्या भव्य पुरस्कार समारंभात सहभाग घेतला.
भारतीय शेतकऱ्यांचा गरजा लक्षात घेता आणि टिकाऊ शेतीय दृष्टीकोनाचा उद्देश्याने, कंपनीने दोन आधुनिक अशी द्रव्य खते – “ श्रीराम पिकासोल” आणि “ श्रीराम मैगनिका” सादर केली. पेटंट केलेल्या तंत्रज्ञानाचा माध्यमाने दोन्ही उत्पादने बायोॲक्टिव टायटॅनियम असलेली भारतातील पहिलीच उत्पादने आहेत. टायटॅनियममुळे वनस्पतीचा पर्यावरणाप्रती असलेला प्रतिकार वाढतो, ज्यामुळे वनस्पतीची आवश्यक पोषण घेण्याची क्षमता सुधारते आणि शेतकऱ्याला चांगले पीक मिळते. “श्रीराम पिकासोल” चा प्रमुख हेतू हा फ़ळाचा रंग आणि आकाराचा समानतेवर भर देण्याचा आहे तर “श्रीराम मैगनिका” चा हेतू हा फ़ळातील त्रुटी कमी करून त्याचे आयुष्य वाढविण्याचा आहे- ज्या दोन्ही निर्यात आणि प्रिमियम बाजारपेठांमधील कठीण अशा समस्या आहेत.
द्राक्ष आणि डाळिंबा सारख्या, या भागातील विशेष पिकांकरिता, कंपनीने स्वत: संशोधन करून विकसित केलेल्या फ़र्टिगेशन उपाययोजना या प्रिमियम आणि निर्यात केल्या जाणाऱ्या द्राक्ष आणि डाळिंबासाठी आहेत , “श्रीराम ड्रिपिट ग्रेप्स” तसेच ”श्रीराम ड्रिपिट पोम” ची निर्मीती ही शेतकरी समूदायामध्ये एक विशेष आकर्षण ठरले आहे.
मागील वर्षी श्रीराम ट्रेक्सटर सारख्या कल्पक किटनाशकाचा सादरीकरणाने कंपनीला हजारो शेतकरी आणि चॅनल पार्टनर्सकडून सकारात्मक अशा प्रतिक्रिया मिळाल्या. चॅनल पार्टनर्सना जपान येथे पेटन्ट आणि विकसित केलेल्या श्रीराम सायशो नामक किटकनाशकाचा प्री-कमर्शीयलायझेशनचाचण्यांचे अतीशय कौतुक वाटले. तणाचा व्यवस्थापनाकरिता आणि किटकनाशकांचा उत्पादनामधील संख्या वाढाव्या म्हणून , कंपनीने ‘श्रीराम एकराईटर’ नामक उत्पादन सादर केले आहे जे एक विषेश असे तणनाशक असून त्याची निर्मीती ही मका आणि ऊसामधील त्रासदायक अशा तणाचा नाश करण्याकरिता करण्यात आलेली आहे.
कंपनीने उच्च प्रगतीशील अशा हायब्रिड वैरायटी देखील सादर केल्या आहेत, जसे श्रीराम ९७०१ कॉर्न आणि श्रीराम ७२११- II बीटी कॉटन सीड ज्यांची वितरकांनी भरपूर प्रशंसा देखील केली. या नव्या उत्पादनांचा सादरीकरणाने भारतीय शेतकऱ्यांना – टिकाऊ आणि लाभदायी पद्धतीने विकसित होण्यासाठी उचललेले एक धोरणात्मक पाऊल आहे.
समूहाचे कार्यकारी संचालक आणि व्यवसायिक प्रमुख असलेले श्री. संजय छाब्रा यावेळी म्हणाले, “ श्रीराम फ़ार्म सोल्युशन्स हा शेतीय कल्पकतेमध्ये स्वत:ला अधिकाधिक सक्षम बनवत असताना, या नव्या युगाची उत्पादने कंपनीची विज्ञानावर उपाय योजना देऊन शेतकऱ्यांना सबळबनविण्याची बांधिलकी दर्शवून देतात, ही उत्पादने त्यांचा वाढत्या गरजा आणि टिकाऊ शेतीय सवयींसंदर्भातील गरजा देखील भागवतात.”
श्रीराम फ़ार्म सोल्युशन्स बद्दल थोडक्यात: श्रीराम फ़ार्म सोल्युशन्स (एसएफ़एस) हा डीसीएम श्रीराम लिमिटेडचा एक भाग असून, हा रू.१२७४१ कोटींपेक्षा अधिकचा टर्नओव्हर असलेला एक व्यवसायिक समूह आहे. श्रीराम फ़ार्म सोल्युशन्स शेतीय उत्पादनाचा व्यवसाय करत असून , बियाणे ,विशेष पोषण आणि पीक संरक्षण श्रेणींचे उत्पादन आम्ही करतो.