Home मनोरंजन प्रसिद्ध रॅप कलाकार यंग डीएसए याने ‘माफ कर’ हे नवे  गाणे केले सादर

प्रसिद्ध रॅप कलाकार यंग डीएसए याने ‘माफ कर’ हे नवे  गाणे केले सादर

22 second read
0
0
90

no images were found

प्रसिद्ध रॅप कलाकार यंग डीएसए याने ‘माफ कर’ हे नवे  गाणे केले सादर

 

कोल्हापूर (प्रतिनिधी):-‘येडा यंग’ या हिप-हॉप गीताच्या अपूर्व यशानंतर प्रसिद्ध रॅप कलाकार यंग डीएसए याने ‘माफ कर’ हे नवे दमदार गीत रसिकांसमोर सादर केले आहे. हे मराठी हिप-हॉप गाणे एका कलाकाराच्या भावनाप्रधान आत्मपरीक्षणाची मांडणी करते. प्रसिद्धी, दबाव आणि वैयक्तिक प्रगती साधताना कलाकाराच्या मनात निर्माण होणारा संघर्ष, पश्चात्ताप आणि वास्तवाचे प्रतिबिंब या गीतातून स्पष्टपणे व्यक्त होते.

      ‘माफ कर’ हे केवळ एक गाणे नसून, स्वतःच्या सत्याची प्रांजळ कबुली आहे. कठोर पण विचारप्रवृत्त करणारी शब्दरचना, निखळ मांडणी आणि कोणत्याही बंधनांपासून मुक्त अनुभवाच्या भावनांमधून साकारलेले हे गीत, यंग डीएसएच्या नेहमीच्या शैलीत मराठी हिप-हॉपला हादरवून सोडते.हे गाणे प्रामाणिकपणासाठी भुकेल्या कलाकाराचे धाडसी विधान आहे. ‘माफ कर’ या गीताची निर्मिती कॉस्मोड्रॉप यांनी केली आहे.

     या गाण्याचे आत्मपरीक्षणात्मक स्वरूप कलाकाराच्या आक्रमकतेच्या जोडीला असुरक्षिततेचेही दर्शन घडवते. त्याचबरोबर कष्ट आणि महत्त्वाकांक्षेने घडत असलेल्या तरुण जीवनाच्या द्वंद्वतेकडेही हे गीत लक्ष वेधते. एक गीत म्हणूनच नव्हे, तर ‘माफ कर’ हे यंग डीएसएच्या वाटचालीला, त्याच्यावर शंका घेणाऱ्या लोकांना, आणि अद्याप शांतीच्या शोधात असलेल्या त्याच्या अंतरात्म्याला समर्पित आहे. या गीतातून गर्दीला सलाम आहे, पण त्याच गर्दीतील गोंधळात चिंतनाचा एक शांत क्षणही सामावलेला आहे.

      या नव्या गीताविषयी यंग  डीएसए म्हणाले की हे गाणे माझ्या प्रत्येक चढ-उताराच्या प्रवासाचे आणि त्यातून मिळालेल्या शिकवणीचे प्रतिबिंब आहे. हे केवळ एक ट्रॅक नाही, तर माझ्या जीवनाचे सत्य आहे. जे अजूनही स्वतःशी प्रामाणिक राहून झगडत आहेत, त्यांच्यासाठी हे गीत आहे. जर माझ्या चाहत्यांनी या गीतालाही ‘येडा यंग’सारखेच प्रेम दिले, तर संगीतनिर्मितीच्या स्वप्नासाठी मी कॉर्पोरेट नोकरी सोडण्याचा घेतलेला निर्णय योग्य होता, असे मला वाटेल.

      या नव्या सादरीकरणातून यंग  डीएसए मराठी हिप-हॉपमधील एक प्रबळ, स्पष्टवक्त्या आणि सत्याशी प्रामाणिक राहणारा आवाज म्हणून स्वतःची ओळख पुन्हा एकदा अधोरेखित करतो – जो आपल्या भाषेत, आपल्या लोकांसाठी, आपले सत्य निर्भीडपणे मांडतो.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

विद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र

विद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र कोल्हापूर,(प्रति…