Home शैक्षणिक अहमदाबाद येथील अदानी विद्या मंदिर देशातील अव्वल शाळांमध्ये सीबीएसई बारावीचा 100% निकाल, 

अहमदाबाद येथील अदानी विद्या मंदिर देशातील अव्वल शाळांमध्ये सीबीएसई बारावीचा 100% निकाल, 

6 second read
0
0
163

no images were found

अहमदाबाद येथील अदानी विद्या मंदिर देशातील अव्वल शाळांमध्ये सीबीएसई बारावीचा 100% निकाल, 

अहमदाबाद येथील अदानी विद्या मंदिरसाठी (एव्हीएमए) हा आनंद द्विगुणित करणारा क्षण आहे. 2008 पासून ही शाळा आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण अभ्यासात हुशार विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलण्याचे काम करत आहे.13 मे रोजी जाहीर झालेल्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बारावीच्या निकालाच्या दिवशीच, एव्हीएमएने नॅशनल अ‍ॅक्रेडिटेशन बोर्ड फॉर एज्युकेशन अँड ट्रेनिंग (नाबेट) कडून 250 पैकी 232 गुण मिळवून देशातील अव्वल शाळांमध्ये स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे, गरजू विद्यार्थ्यांसाठी चालवलेल्या शाळांच्या श्रेणीत शाळेने अव्वल स्थान मिळवले आहे.ही क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया अंतर्गत (क्यूसीआय) नाबेटकडून मिळालेली लेटेस्ट रेटिंग आहे.

याआधी 2020 मध्ये एव्हीएमए ही देशातील पहिली पूर्णपणे मोफत शिक्षण देणारी शाळा ठरली जिने नाबेट अंतर्गत क्यूसीआय मान्यता मिळवली होती.हा नवा सन्मान अदानी फाउंडेशनच्या सर्वसमावेशक, उच्च दर्जाच्या आणि सर्वांगीण विकास साधणाऱ्या शैक्षणिक ध्येयाशी सुसंगत आहे.सीबीएसई बारावीचा निकाल ही जणू नाबेटच्या यशावर दुधात साखर पडल्याप्रमाणे ठरली. एव्हीएमएचा निकाल 100% लागला असून सर्व 95 विद्यार्थ्यांनी फर्स्ट डिव्हिजन मिळवली. अल्विना रॉय आणि जय बावसकर या दोघांनी ह्युमॅनिटीज व सायन्स या विषयात अनुक्रमे 97.6% गुण मिळवले.

      फेब्रुवारीमध्ये एव्हीएमएला ‘स्कुल फॉर अंडर प्रिव्हिलेज्ड/राईट टू एज्युकेशन (आरटीई)’ या श्रेणीत ‘नॅशनल विनर’ घोषित करण्यात आले आणि शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांत मजूमदार यांच्या हस्ते ‘समग्र शिक्षा पुरस्कार’ प्राप्त झाला.एव्हीएमए 2015 मध्ये आपल्या अभ्यासक्रमात संयुक्त राष्ट्रांनी स्वीकारलेल्या ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स’ (एसडीजीएस) चा समावेश केला, ज्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक दृष्टिकोनानुसार शिक्षण मिळेल.

एव्हीएमएने गेल्या तीन वर्षांत युनिसेफ, गुजरात सायन्स सेंटर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन (एनआयई), सिंगापूर यांसारख्या नामवंत संस्थांशी भागीदारी करून भारतातील विद्यार्थ्यांच्या गरजांनुसार विशेष एसटीईम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथ्स) अभ्यासक्रम तयार करत आहे.एव्हीएमए ला मिळालेल्या अन्य महत्त्वाच्या पुरस्कारांमध्ये ग्रीन मेंटर्सकडून कॉर्नेल विद्यापीठ, न्यू यॉर्क, यूएसए येथे दिला गेलेला ‘इंटरनॅशनल ग्रीन स्कूल अवॉर्ड’ , तसेच ‘रँडम ऍक्ट्स ऑफ काइंडनेस’ संस्थेकडून दिलेली ‘काइंडनेस स्कूल’ सर्टिफिकेशन यांचा समावेश आहे. हे सर्व पुरस्कार पर्यावरणस्नेही शिक्षण आणि दयाळूपणाच्या संस्कारांना शाळा किती महत्त्व देते, हे दर्शवतात.गुजरातमधील अहमदाबाद व भद्रेश्वर, छत्तीसगडमधील सुरगुजा आणि आंध्र प्रदेशातील कृष्णपट्टणम या चार ठिकाणी एव्हीएमएच्या शाळा असून यात एकूण 3,000 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…