Home मनोरंजन भावनांनी व्यापलेल्या नात्यांची उत्कट कहाणी असणारा ‘अमायरा’  चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित 

भावनांनी व्यापलेल्या नात्यांची उत्कट कहाणी असणारा ‘अमायरा’  चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित 

5 second read
0
0
9

no images were found

भावनांनी व्यापलेल्या नात्यांची उत्कट कहाणी असणारा ‘अमायरा’  चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित 

 

 

संपूर्ण महाराष्ट्रभर प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या दर्जेदार सिनेमांच्या मालिकेत अजून एक हृदयस्पर्शी चित्रपटाची भर पडत आहे. नात्यांचे गुंतागुंतीचे रंग उलगडणारा, विविध भावनांना स्पर्श करणारा आणि नात्यांच्या शोधात असलेल्या प्रत्येकाच्या मनाला भिडणारा मुक्ता आर्टस् निर्मित आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘अमायरा’ या चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित झालाय. 

या ट्रेलर मध्ये नात्यांतील प्रेम, दुरावा, समज-गैरसमज आणि एकमेकांना समजून घेण्याचा संघर्ष अतिशय प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे. त्याच बरोबर अमायराच्या आयुष्यातील काही कठीण निर्णयांचे क्षण सुद्धा आपण पाहू शकतो. “अमायरा” केवळ एक कथा नाही, तर अनेकांच्या आयुष्यातील वास्तवाचा आरसा वाटतो. ट्रेलर शेवटी एक विचार देऊन जातो “कधी नातं शोधावं लागतं, आणि कधी स्वतःला…” जो मनात खोलवर घर करतो.

चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे लोकेश गुप्ते ह्यांनी, तर मुक्ता आर्टस् ने निर्मिती केली आहे. ए व्ही के एंटरटेनमेंट आणि महलसा एंटरटेनमेंट च्या अंतर्गत हा सिनेमा बनला आहे. चित्रपटात अजिंक्य देव, राजेश्वरी सचदेव, पूजा सावंत, सई गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सगळ्यांनी चित्रपटात साकारलेली भावस्पर्शी पात्रं ही प्रत्येक प्रेक्षकाला स्वतःची वाटू शकतात, एवढा या कथानकात गहिरा भावनिक प्रवास आहे.

चित्रपटाचे संगीत, पार्श्वसंगीत व छायाचित्रण हे देखील या चित्रपटाच्या आत्म्यातील महत्त्वाचे पैलू आहेत. नात्यांमधल्या सूक्ष्म भावना, गैरसमज, आत्मीयता आणि शोध यांचं सुरेख चित्रण म्हणजेच ‘अमायरा’

 “अमायरा” या सिनेमाचे दिग्दर्शक लोकेश गुप्ते हे आहेत तर लेखक मिहीर राजदा आहेत. तसेच राहुल पुरी, स्वाती खोपकर, सुरेश गोविंदराय पै निर्माते आहेत. तसेच सह निर्माते निनाद नंदकुमार बत्तीन आणि तबरेज पटेल हे आहेत. “अमायरा” हा सिनेमा २३ मे २०२५ ला  सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्यासाठी पाठपुरावा करू, नामदार मुरलीधर मोहोळ यांची ग्वाही

  कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्यासाठी पाठपुरावा करू, नामदा…