Home शासकीय नाले सफाईची कामे 31 मे पर्यंत पूर्ण करा –   प्रशासक के.मंजुलक्ष्मी

नाले सफाईची कामे 31 मे पर्यंत पूर्ण करा –   प्रशासक के.मंजुलक्ष्मी

25 second read
0
0
22

no images were found

नाले सफाईची कामे 31 मे पर्यंत पूर्ण करा –   प्रशासक के.मंजुलक्ष्मी

 

कोल्हापूर (प्रतिनिधी ):- नाले सफाईची कामे 31 मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांना दिल्या. तर सार्वजनिक गणेश उत्सव 2025 च्या अनुषंगाने इराणी खणीतील गाळ पावसाळयापुर्वी काढण्यासाठी तातडीने दोन दिवसात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांना दिल्या. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरात मान्सुपुर्व नालेसफाईचे कामे सुरू आहेत. त्या अनुषंगाने आज सकाळी आयुक्त कार्यालयात नाले सफाई कामाची आढावा बैठक घेण्यात आली.

       यावेळी प्रशासक के मंजूलक्ष्मी यांनी उर्वरित चॅनल्स, नाले व मॅनहोल यांची सफाई लवकरात लवकर करुन घ्यावी. सर्व नोडल अधिकारी व उप-शहर अभियंता यांनी त्यांच्या त्यांच्या विभागीय क्षेत्रीय कार्यालयात वेळोवेळ फिरती करुन नाले सफाई कामाची तपासणी करण्याच्या सुचना दिल्या. यासाठी विभागीय कार्यालयस्तराव सर्व कनिष्ठ अभियंता व आरोग्य निरिक्षक यांची बैठक घेऊन कामाचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या.

            प्रारंभी आज पर्यंत झालेल्या नालेसफाईबाबत माहिती मुख्य आरोग्य निरिक्षक विजय पाटील यांनी स्लाईडशोद्वारे दिली. यामध्ये आजअखेर 65 कर्मचाऱ्यांच्या दोन पथकामार्फत मनुष्यबळाव्दारे 476 चॅनलपैकी 318 चॅनलचे काम पुर्ण करण्यात आलेले आहे. तर जेसीबीच्या सहाय्याने 236 चॅनल्सपैकी 96 चॅनल सफाई करण्यात आले असल्याचे सांगितले. तसेच तीन मुख्य नाल्यापैकी संप आणि पंप हाऊस पासून व्हिल्सन पुलापर्यंत 2 पोकलॅन्डच्या सहाय्याने गाळ काढण्यात आला असून याठिकाणचा सर्वाधिक सात हजार टनापेक्षा जास्त प्लॅस्टीक कचरा व गाळा काढण्यात आला असलेचे सांगितले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उप-आयुक्त पंडीत पाटील, सहा.आयुक्त नेहा आकोडे, उज्वला शिंदे, संजय सरनाईक, स्वाती दुधाणे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, जल अभियंता हर्षजीत घाटगे, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, उपशहर अभियंता महादेव फुलारी, रमेश कांबळे, सुरेश पाटील, अरुण गुजर, उपशहर रचनाकार एन.एस.पाटील, कामगार अधिकारी राम काटकर, मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ.विजय पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, रवका अधिकारी प्रशांत पंडत उपस्थित हेाते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…