
Oplus_131072
no images were found
डॉ. अर्चना जगतकर यांचे विद्यापीठात व्याख्यान
कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठाच्या जीवरसायनशास्त्र अधिविभागात ‘विकसित भारतासाठी स्त्रियांचे योगदान’ या विषयावर न्यू कॉलेजच्या समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. अर्चना जगतकर यांचे विशेष व्याख्यान झाले.
महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या व्याख्यानास अधिविभागातील शिक्षकांसह कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते. डॉ. पद्मा दांडगे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी अधिविभाग प्रमुख डॉ. कैलास सोनवणे उपस्थित होते.