Home सामाजिक सिक्कीममध्ये भूस्खलनामुळे ५५० पर्यटक अडकले

सिक्कीममध्ये भूस्खलनामुळे ५५० पर्यटक अडकले

0 second read
0
0
59

no images were found

सिक्कीममध्ये भूस्खलनामुळे ५५० पर्यटक अडकले

गेल्या आठवड्यापासून अनेक राज्यात मुसळदार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे काही राज्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान आज सकाळी सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे ५५० पर्यटक अडकून राहिले आहेत. त्यांच्या मदतीसाठी स्ट्रायकिंग लायन डिव्हिजनच्या तुकड्या दाखल झाल्या आहेत. अडकलेल्या पर्यटकांना जेवण तसेच पाणी पुरवण्यात आल्याचे भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हवामान अजूनही खूपच खराब असल्याने लोकांना सुरक्षेशी संबंधित माहितीही दिली जात आहे. तसेच आजारी पर्यटकांना औषध पुरवठाही करण्यात आला आहे.  राज्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन झालेय. या भूस्खलनानंतर राजधानी गंगटोक आणि त्याच्या लगतच्या भागातील पाणीपुरवठाही खंडीत झाला असून उत्तर सिक्कीम जिल्ह्यातील विविध ठिकाणी रस्ता खराब झाल्याने पर्यटक अडकल्याचे समजते. हिमालयीन राज्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याने पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत-बांगलादेश सीमा आणि गंगटोकला सिलीगुडीमार्गे जोडणारा राष्ट्रीय महामार्ग पूर्व जिल्ह्यातील सिंगताम आणि पाकयोंग जिल्ह्यातील रंगपो दरम्यान खराब झाला आहे. हा महामार्ग सिक्कीम आणि पश्चिम बंगालला जोडतो. ढिगारा साफ करण्याचे काम जलदगतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मुसळधार पावसामुळे या महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. तेथे कोणत्याही क्षणी दरड कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…