
no images were found
मास कम्युनिकेशनच्या माजी विद्यार्थ्यांचा शनिवारी मेळावा
कोल्हापूर (प्रतिनिधी ) :-शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शनिवार दि. 25 जानेवारी रोजी आयोजित केला आहे. एम. ए. मास कम्युनिकेशन हा कोर्स 2005 साली सुरु झाला. दरम्यानच्या काळात या कोर्सचे विद्यार्थी अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करुन त्यांचे संघटन करण्याचा आणि त्यातून विभागात काही सकारात्मक उपक्रम राबविण्याचा मास कम्युनिकेशन विभागाचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर अधिविभागात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे.