Home शैक्षणिक डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये एचआर कोन्क्लेव्ह उत्साहत 

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये एचआर कोन्क्लेव्ह उत्साहत 

42 second read
0
0
51

no images were found

 

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये एचआर कोन्क्लेव्ह उत्साहत 

 

कोल्हापूर ( प्रतिनिधी):-कुशल मनुष्यबळ हा कोणत्याही संस्थेचा  मुख्य घटक आहे. संस्थेची प्रगती ही मनुष्यबळाच्या कुशल व्यवस्थापनावरच अवलंबून आहे. संस्थेमध्ये सकारात्मकता, सर्जनशीलतेसाठी पोषक वातावरण आणि संस्थेप्रती आत्मीयता निर्माण करणे या सर्व प्रक्रियेमध्ये मनुष्यबळ विभागाचे मोठे योगदान असते, असे प्रतिपादन सिंटेल बाय अरविंदचे मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापन अधिकारी श्री सुधीर मतेटी यांनी केले.  

       डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या  स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटच्यावतीने शनिवारी आयोजित ह्युमन रिसोर्स कोन्क्लेव्हच्या उद्घाटन समारंभावेळी ते बोलत होते. एचआर फोरम इंडिया, कोल्हापूर फोंड्री अँड इंजीनियरिंग क्लस्टर-सेंटर फॉर एक्सलन्स आणि मतेटीज सोशल माइंडसेट एचआर फौंडेशनच्या सहकार्याने या कोन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले होते. एचआर क्षेत्रातील अधिकाऱ्याना एकत्रित आणून अभ्यासपूर्ण चर्चा घडवून व्यावसायिकांच्या पुढील पिढीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. 

         मतेटी पुढे म्हणाले,  आज औद्योगिक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. या बदलाचा वेग हा प्रचंड आहे आणि त्याबरोबर आपल्याला टिकायचे असेल तर मनुष्यबळ विकास यासाठी वेगवेगळ्या संकल्पना राबवणे गरजेचे आहे. 

         कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता यांनी डी वाय पाटील ग्रुपचा विस्तार व कार्य याबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर वेगवेगळ्या औद्योगिक संस्था आणि डी वाय पाटील ग्रुप मधील शैक्षणिक संस्था यांच्यामध्ये कशा प्रकारे सहयोग करता येतील याबद्दल विवेचन केले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संचालक डॉ. अजित पाटील यांनी केले. डी वाय पाटील मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी अशा प्रकारच्या कार्यशाळेची गरज विषद केली. यावेळी विद्यापीठाचे  कुलसचिव डॉ.व्ही व्ही भोसले, प्रा अभय जोशी हे उपस्थित होते.यावेळी सोहम दादरकर यांनी नाट्य स्वरूपामध्ये संस्थेमधील कर्मचाऱ्यांचा अनुभव अधिकाधिक आनंदमय कसा करता येईल याबद्दल सादरीकरण केले. 

         दोन पॅनल डिस्कशन्स मध्ये वेगवेगळ्या मान्यवरांनी सहभाग घेतला. डी. वाय. पाटील ग्रुपच्या सीएचआरओ श्रीलेखा साटम,  डॉ. अजित पाटील, टाटा मोटर्सचे विकास शिंदे, वेंकीज इंडियाचे डॉ. वैभव देशमुख, विलो मॅथर अँड प्लॅट पंपच्या कल्याणी कुलकर्णी, मिंडा वस्टचे अनंत पाटील, प्रीती आहुजा,  स्पार्क मिंडाचे रविंद्र जगदाळे, कॅव्हिस्टाच्या रूपा कुलकर्णी, सुमाक्स इंटरप्रयझेसच्या वसंत कांबळे,  मौर्या ग्रुपच्या मीनाक्षी नाडगौडा, आय -सोर्स इन्फोसिस्टीमच्या मंजिरी कुलकर्णी, प्रा. रेणुका तुरंबेकर, शालू रामाणी आदींच्या सहभाग होता. यामध्ये तज्ञांनी कर्मचाऱ्यांची कामाप्रती असणारी प्रतिबद्धता आणि इंडस्ट्री ॲकॅडेमिया स्किल्स गॅप यावरील अनुभव  शेअर केले. कंपन्या व उद्योगसमुह आणि शैक्षणिक संस्था यांच्या एकमेकांकडून काय अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी काय करता येईल याबाबत विद्यार्थी आणि  एचआर प्रोफेशनल्स याना सक्षम करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. 

      एचआर कॉन्क्लेव्हसाठी सुमारे 90 एचआर प्रोफेशनल आणि व्यवस्थापन विभागाचे  विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रा.अनिकेत परदेशी, प्रा व्यंकटेश बडवे यांनी केले. डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचे डीन प्रा. सुदर्शन सुतार यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण &…