Home मनोरंजन महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणेची जोडी पहिल्यांदाच एकत्र झळकणार

महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणेची जोडी पहिल्यांदाच एकत्र झळकणार

19 second read
0
0
29

no images were found

महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणेची जोडी पहिल्यांदाच एकत्र झळकणार

 

काय ऐकलात का ? मराठी चित्रपटसृष्टीतील दोन सर्वात प्रतिष्ठित कलाकार आपल्या सर्वांचे आवडते म्हणजेच महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे, त्यांच्या तीन दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत प्रथमच एका आगामी मराठी चित्रपट “देवमाणूस” साठी एकत्र येत आहेत. 

         होय वास्तव, नटसम्राट आणि मी शिवाजीराजे भोसले बोलतोय यांसारख्या चित्रपटांतील आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे अभिनेते महेश मांजरेकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चा ठसा चांगलाच उमटवला आहे. इंटेन्स ड्रामा ने भरपूर अशा भूमिकांपासून ते पावरफुल ॲक्शन-पॅक व्यक्तिरेखा साकारत महेशजींनी मनोरंज विश्वात सर्वात प्रतिष्ठित अभिनेत्यांपैकी एक अशी आपली जागा बनवली आहे. दुसरीकडे अभिनेत्री रेणुका शहाणे, हम आपके है कौन, अबोली, जानिवा यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या अभूतपूर्व भूमिकांमुळे प्रसिद्ध आहेत, त्यांनी आतापर्यंत साकारलेल्या प्रत्येक भूमिकाची शोभा वाडवली आहे. टीव्ही आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रात दमदार कारकीर्दीसह, त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. 

अभिनेते महेश मांजरेकर ह्यांनी ह्या सिनेमा बद्दल आपले मत व्यक्त करताना सांगितले, “देवमाणूस सारख्या चित्रपटामध्ये रेणुकासोबत काम करणे हा माझासाठी एक खूप बहुप्रतिक्षित सर्जनशील प्रवास वाटतो. मी सध्या या नव्या ऑन-स्क्रीन भागीदारीबद्दल खूप जास्त उत्साहित आहे आणि आशा करतो की आपले प्रेक्षक सुद्धा आमच्या या नव्या जोडीसाठी असाच उत्साह दाखवतील.”

       तसच अभिनेत्री रेणुका शहाणे या म्हणाल्या, “देवमाणूसच्या निमित्ताने मी महेश सोबत जरी पहिल्यांदा काम करत असले तरी आम्ही एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतोय, त्यामुळे असं  वाटलंच नाही की आम्ही यापूर्वी एकत्र काम केल नाहीये. मला खात्री आहे ‘देवमाणूस’ बघून प्रेक्षकांना काहीतरी दमदार बघितल्याचं समाधान मिळेल. खूप वर्षांनी मला मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळालीये, त्याचा विशेष आनंद होतोय.”

      बहुचर्चित तेजस प्रभा विजय देवस्कर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. ज्यांनी माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट, रकुल प्रीत सिंग सोबत छत्रीवाली यासारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. “देवमाणूस” सिनेमात दिग्गज कलाकार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे एका वेगळ्याच भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत जे प्रेक्षकांसाठी पूर्णपणे नवीन अनुभव असणार आहे. दोन्ही कलाकारांचे जबरदस्त अभिनय कौशल्य प्रदर्शित करण्याचे वचन हा आगामी मराठी चित्रपट देणार आहे. या अभिनेत्यांचे चाहते एका अविस्मरणीय अनुभवाची वाट पाहू शकतात, जिथे महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी आणि त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री हे मुख्य आकर्षण असेल त्यामुळे नक्कीच हा चित्रपट एक जबरदस्त मेजवानी ठरणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …