
no images were found
गार्डन्स क्लबच्या पुष्पप्रदर्शनास शोभायात्रेने सुरुवात
तीन दिवस भरणार फुलांचा महोत्सव: नागरिकांसाठी पर्वणी
कोल्हापूर (प्रतिनिधी):-सेंद्रिय खते वापरूया….मातीचे आरोग्य सुधरुया….माझा देश माझी धरती…माती जपा, जीव जपा अशा घोषणा देत आज गार्डन्स क्लबच्या वतीन शोभा यात्रा काढण्यात आली.
गार्डन्स क्लब ऑफ कोल्हापूर व कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात आलेल्या ५४ व्या पुष्प प्रदर्शनानिमित्य घेण्यात आलेल्या स्पर्धांची सुरुवात आज झाली. कोल्हापूरकरांच्या मनात पर्यावरणाविषयी जागरुकता, आपुलकी व प्रेम निर्माण करणे, पर्यावरण रक्षण व संवर्धन करणे यात सर्वात सदैव कटीबध्द असलेली गार्डन्स क्लब ही शहरातील खूप नावाजलेली व ५३ वर्षांपासून कार्यरत असलेली सामाजिक संस्था आहे.
यंदाच्या वर्षी ‘आपली माती आपले भवितव्य’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत विविध कल्पना राबवत रचना व सजावट महावीर उद्यानात करण्यात आली आहे. या प्रसंगी संध्याकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभा यात्रेचे उद्घाटन झेंडा दाखवून एसडीएम आजरा चे उपजिल्हाधिकारी हरीश सूळ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी घोषणा देवून बालचमूंनी परीसर दणाणून सोडला.पाना फुलांच्या वेशभूषेत बालचमू या शोभायात्रे सहभागी झाले होते.विविध शाळा, सामाजिक संस्था, कोल्हापुरातील मान्यवर नागरीकांचा यात महत्त्वाचासहभाग होता. या पुष्पप्रदर्शनानिमित्ताने नागरीकांमध्ये माती विषयक जनजागृती, आस्था, प्रेम निर्माण करणे हा मुख्य हेतू साधला गेला.
गार्डन्स क्लबचे सदस्य, ग्रीन एजुकेशनचे विद्यार्थी ,शिक्षक व अनेक स्पर्धकांचा समावेश व सहभाग होता. शोभायात्रेच्या सांगते नंतर बालचमूंना खाऊ वाटप करण्यात आले.
प्रदर्शनात मांडलेल्या बागकामासाठी उपयुक्त अश्या वस्तूंच्या स्टाॅल्सचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या मा. वैष्णवी पाटील, डीवायएसपी, अँटीकरप्शन, यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनतर नागरीकांसाठी हे स्टॉल्स् खुले करण्यात आले. फक्त कोल्हापुरातीलच नव्हे तर पुणे, सांगली, बेळगाव अश्या अनेक शहरांतून बागकाम साहित्य जसे कुंड्या, स्टॅन्ड, रोपे, कंद, सेंद्रिय किटकनाशके, एन्झाइम्स इ. घेवून स्टॉलधारकांनी आकर्षक मांडणी केली आहे. कोल्हापुरकरांसाठी खरेदीची ही पर्वणीच आहे.
मा. प्रमोद माने, सबरीजनल ऑफिसर, एम.पी.सी.बोर्ड यांच्या हस्ते चला प्राणी बनवूया य मातीपासून विविध प्राणी बनवण्याच्या कार्यशाळेचे उदघाटन झाले.टेराकोटा जर्नीचे गौरव काईंगडे आणि त्यांचे सहकारी यांनी ही कार्यशाळा घेतली.तसेच प्राणी व पक्षी अभ्यासक धनंजय जाधव यांचे ‘प्राणी शहराकडे का वळतात ‘? या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन झाले.
महावीर उद्यानात गार्डन्स क्लबने दरवर्षीप्रमाणे पुष्पप्रदर्शनाबरोबरच अनेक स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. त्यामध्ये गुलाब आणि विविध प्रकारची फुले, कुंडीतील रोपे, सॅलेड डेकोरेशन, बोन्साय, फुले, पाने व पाकळ्यांची रांगोळी, बुके, बोन्साय, मुक्त रचना, लॅन्डस्केपींग इ. च्या स्पर्धांचे आयोजन केले आहे.विशेष आकर्षण म्हणजे स्किट कॉम्पिटिशन आणि बोटॅनिकल फॅशन शो हे आवर्जून पहावे असे आहे.
कोल्हापूरकरांनी या दोन दिवसात म्हणजे सात व आठ डिसेंबर रोजी या प्रदर्शनाला भेट देऊन प्रदर्शित कलाकृतींचा आस्वाद घ्यावा, व्याख्याने ऐकावी, कार्यशाळेत सहभागी व्हावे, बोटॅनिकल फॅशन शो, तसेच शॉर्ट फिल्म, स्कीट कॉम्पिटिशन यांचा आनंद घ्यावा असे आवाहन गार्डन्स क्लबतर्फे करण्यात येत आहे.
यावेळी गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी,उपाध्यक्ष अविनाश शिरगावकर, सचिव सुप्रिया भस्मे, खजानिस प्राजक्ता चरणे ,कार्यकारणी सदस्य सुनिता पाटील, शशिकांत कदम, सल्लागार सदस्य रुपेश हिरेमठ, अंजली साळवी, सुभाष अथणे, शांतादेवी पाटील, चित्रा देशपांडे, गौरव काइंगडे, सुमेधा मानवी रघुनंदन चौधरी, कल्पना सावंत, रूपा शहा, रविंद्र साळोखे उपस्थित होते..