
no images were found
‘गल्फ ऑइल’च्या वतीने ‘चाय-पकोडा’ बाइक रॅलीचे आयोजन
कोल्हापूर, ( प्रतिनीधी):-कोल्हापूरच्या सुटसुटीत आणि स्वच्छ रस्त्यांवर आता दुचाकीस्वारांची धूम पाहायला मिळणार आहे. ‘गल्फ ऑइल लुब्रिकन्ट्स इंडिया लिमिटेड’ या प्रसिद्ध कंपनीच्या वतीने कोल्हापुरात ‘चाय-पकोडा’ बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ‘चाय-पकोडा’ बाइक रॅलीचे हे दुसरे वर्ष आहे. या अगोदर गेल्या वर्षी आयोजित केलेल्या ‘चाय पकोडा बाइक रॅली’ला बाइकस्वारांकडून अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. बाइकस्वारांचा प्रतिसाद लक्षात घेत, यंदाही आयोजकांनी कोल्हापुरात ‘चाय-पकोडा’ बाइक रॅलीचे दमदार आयोजन केले आहे. मोठ्या दिमाखात साजरी होणारी ही बाइक रॅली ‘गल्फ ऑइल लुब्रिकन्ट्स इंडिया लिमिटेड’ आणि ‘इंडिया बाइक वीक २०२४’ यांच्या भागीदारीतून आयोजित केली जाणार आहे. आशिया खंडातील दुचाकीस्वारांचा सर्वात मोठा फेस्टिवल म्हणून ‘इंडिया बाइक वीक’कडे पाहिले जाते. या फेस्टिवलला ‘गल्फ ऑइल लुब्रिकन्ट्स इंडिया लिमिटेड’च्या वतीने सलग दुसऱ्यांदा प्रयोजिकत्व दिले जात आहे. कोल्हापुरात यंदाच्या वर्षात रंगणाऱ्या बाइक रॅलीत कडकडीत चहा आणि गरमागरम भज्यांचा आस्वाद घेत, मोठ्या संख्येने दुचाकीस्वारांचे बाइकप्रेम, धाडस आणि सौहार्द पाहायला मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या अगोदर २०२४च्या स्वागतासाठी कोल्हापुरात भव्यदिव्य बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नव्या बाइक रॅली आयोजनाच्या वेळी गेल्या वर्षीच्या आठवणींना उजाळा मिळाला. पहिल्या रॅलीत केवळ कोल्हापुरातूनच नव्हे, तर देशभरातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या बाइकप्रेमींनी सहभाग नोंदविला होता. कोल्हापुरातील प्रसिद्ध केएसबीपी उद्यानाजवळील बायकर्स चौक येथे बाइक रॅलीला सुरुवात झाली होती. गर्द वनराई आणि मोकळ्या रस्त्यातून तब्बल २३ किलोमीटरपर्यंत बाइकस्वारांनी धूम केली. मडाले येथील प्रसिद्ध ‘माउंटन व्यूव्ह रिसॉर्ट’ येथे रॅलीची सांगता झाली. या रॅलीमध्ये आयोजकांकडून दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेची सर्वतोपरी काळजी घेण्यात आली होती. रॅली सुरू होण्यापूर्वीच सर्व बाइकस्वावारांना सुरक्षिततेबाबतचे मूलभूत प्रशिक्षण दिले गेले. रॅलीदरम्यान कोणतीही दुर्घटना होऊ नये, नियोजित कार्यक्रमाचे योग्य समन्वय साधले जावे, यासाठी ‘इंडियन बायकर्स वीक’ च्या प्रमुखांनी रॅलीचे नेतृत्व केले. ‘गल्फ ऑइल लुब्रिकन्ट्स इंडिया लिमिटेड’च्या वतीने सर्व बाइकस्वारांना सुरक्षित जॅकेट पुरविले गेले. रॅली व्यवस्थित पार पडल्यानंतर कार्यक्रमाची रंगत वाढविण्यासाठी विविध खेळांचे आयोजन केले गेले. पुश अप्स आणि व्यायामाच्या विविध स्पर्धामध्ये दुचाकीस्वार मोठ्या हिरिरीने सहभाग घेत होते. रॅलीच्या सांगता कार्यक्रमातही दुचाकीस्वारांचा उत्साह पाहून आयोजकांनीही समाधान व्यक्त केले.
आगामी बाइक रॅली कार्यक्रमाबद्दल माहिती देताना ‘गल्फ ऑइल लुब्रिकन्ट्स इंडिया लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवी चावला म्हणाले की, “यंदाच्या वर्षात आम्ही पुन्हा ‘चाय पकोडा बाइक रॅली’चे आयोजन करत आहोत. यंदाही इंडियन बायकर्स वीकसोबत आमची भागीदारी असेल. भारतातील दुचाकीस्वार समूहांना पाठिंबा देण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दुचाकीस्वारांमधील धाडसी प्रवृत्ती, तसेच एकमेकांबद्दल बंधुता टिकून राहावी, त्यांना मोकळ्या रस्त्यांवर दुचाकीचा मनमुराद आनंद लुटता यावा, या हेतूखातर आम्ही रॅलीचे आयोजन करतो. आखाती देशांमध्ये टायर निर्मिती क्षेत्रात आम्ही उत्तम दर्जाच्या सेवा पुरवितो. दुचाकी चालविताना बायकर्सला कोणताही त्रास होणार नाही, याची सर्वतोपरीने काळजी घेतली जाते. टायरच्या निर्मिती क्षेत्रापुरते मर्यादित राहणे, हे आमचे उद्दिष्ट नव्हे. जगभरात बाइक संस्कृती बहरली जावी, याकरिता आम्ही अशा उपक्रमांचे आयोजन करू.”
‘इंडियन बायकर्स वीक’च्या वतीने देशभरातील विविध भागात बाइक रॅलींचे आयोजन केले जात आहे. कोल्हापुरात होणाऱ्या बाइक रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या ‘इंडियन बायकर्स वीक’ची ही ११वी रॅली असेल. या रॅलीमुळे दुचाकीस्वारांचा एकमेकांशी संपर्क वाढतोय, अनुभव द्विगुणित होतोय. वळणावळणाच्या रस्त्यातून निसर्गाचा आनंद घेत सोबत चहा आणि गरमागरम भज्यांचा आनंद लुटत ‘चाय पकोडा रॅली’ यंदाही यशस्वी ठरेल, ही रॅली सर्वांच्या मनात अविस्मरणीय आठवण देऊन जाईल, असा आयोजकांनी विश्वास व्यक्त केला.
इंडिया बाइक वीकमध्ये कंपनी सातत्याने सहभाग नोंदवत आहे. भारतातील दुचाकीस्वारांबद्दल कंपनी आपल्या टायर निर्मिती क्षेत्रातील सेवा देण्यास सज्ज आहे, हा प्रामाणिक हेतू आयोजनाच्या सहभागातून अधोरेखित होतो. टायरची निर्मिती होताना योग्य पद्धतीने वंगण राहील, रस्त्यावर टायर व्यवस्थित चालेल ही दुचाकीस्वारांची मागणी लक्षात घेत, टायरची निर्मिती करण्यात आली आहे. ‘गल्फ ऑइल’ ही जगभरात टायर निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. टायरच्या निर्मितीबाबत उत्तम दर्जाची सेवा ही ग्राहकांकडून मिळालेली पोचपावती कंपनीची विश्वासार्हता आणि तत्परतेचे प्रतीक आहे.