
no images were found
राजधानीत महर्षी वाल्मिकी जयंती साजरी
नवी दिल्ली : महर्षी वाल्मिकी यांची जयंती महाराष्ट्र सदन येथे आज साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंह यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या वेळी अपर निवासी आयुक्त नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार व स्मिता शेलार उपस्थित होत्या. या प्रसंगी उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.