no images were found
कलाकारांना वेगवेगळ्या मूडनुसार आवडणाऱ्या कॉफी
अनेक कलाकारांना कॉफीच्या आस्वादामधून उत्साहपूर्ण आनंद मिळतो. कॉफी त्यांच्यासाठी उत्साहपूर्ण सोबती आहे, जी त्यांच्या बदलणारे मूड, व्यस्त वेळापत्रक आणि बदलत्या हवामानाशी जुळून जाते. एण्ड टीव्ही कलाकार त्यांच्या पसंतींचा डायनॅमिक जीवनावर होणाऱ्या परिणामाबाबत सांगत आहेत. हे कलाकार आहेत आशुतोष कुलकर्णी (क्रिष्णन बिहारी वाजपेयी, ‘अटल’), स्मिता साबळे (धनिया, ‘भीमा’), योगेश त्रिपाठी (दरोगा हप्पू सिंग, ‘हप्पू की उलटन पलटन’) आणि शुभांगी अत्रे (अंगूरी भाबी, ‘भाबीजी घर पर है’). स्मिता साबळेकॉफीसोबतच्या नात्याबाबत सांगताना म्हणाल्या, “कॉफी माझी सोबती आहे, पण सरत्या दिवसासह माझ्या निवडी बदलत जातात. शूटिंगला जातना मी ब्लॅक कॉफीचा आस्वाद घेते, ज्यामधून मला ऊर्जा मिळते. थंडावा असल्यास मी उबदारपणासाठी क्रीमी कॅपुचिनोला प्राधान्य देते. गरम होत असले तर आइस्ड लॅटे मला थंडावा देते आणि उत्साही राहण्यास मदत करते. माझ्या मूडचा देखील निवडीवर परिणाम होतो. मी थकलेले असताना किंवा उत्साहित होण्याची गरज असताना स्मूद फ्लेवर्ड कॉफीचा आस्वाद घेते. हे साधे पेय माझ्या दिवसभरातील बदलांशी जुळून जाते, मला खडतर सीन्समध्ये उत्साहित करण्यास मदत करते, तसेच टेक्सदरम्यान शांतमय क्षणांचा अनुभव देते.” आशुतोष कुलकर्णीम्हणाले, “कॉफी भावनिक सोबती आणि माझ्या नित्यक्रमाचा भाग आहे. हवामान आणि मूडसह माझ्या पसंतीमध्ये बदल होतो. सकाळच्या वेळी मी फ्रेंच रोस्ट कॉफीचा आस्वाद घेतो, तर मी चिंताग्रस्त असताना व्हॅनिला लॅटे मला शांतमय अनुभव देते. कामामध्ये व्यस्त असताना इस्प्रेसो मला अवधान केंद्रित ठेवण्यास मदत करते. रविवारी सुट्टीच्या दिवशी मला क्रीमी कॅपुचिनोचा आस्वाद घ्यायला आवडते. बदलत्या ऋतूंनुसार माझ्या चवींमध्ये देखील बदल होतो. मी हिवाळ्यामध्ये उबदार, स्पाइस्ड लॅटेला आणि उन्हाळ्यामध्ये आइस्ड कॉफीला प्राधान्य देतो. या प्रत्येक निवडीमधून माझ्या भावना दिसून येतात, ज्यामधून मला आनंद मिळतो आणि जीवनातील चढ-उतारांमधून नेव्हिगेट करण्यास मदत होते.”
योगेश त्रिपाठी म्हणाले, “कॉफी माझ्यासाठी दैनंदिन प्रथा प्रमाणे आहे, जी माझ्या बदलत्या मूडशी जुळून जाते. सकाळच्या वेळी मी उत्साहित होण्यासाठी इटायलियन रोस्टचा आस्वाद घेतो. सूदिंग कॅपुचिनो तणावात असताना मला शांतमय वातावरणाचा अनुभव देते आणि इस्प्रेसो मला कामामध्ये लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. पावसाळ्यामध्ये सिनॅमोनसह गरमागरम लॅटे उत्साही अनुभव देते. अधिक काम करण्याची गरज असताना थंड ब्रूचा आस्वाद मला उत्साहित ठेवतो. माझ्या निवडीमधून उत्साहीपासून आरामदायीपणापर्यंत माझी मन:स्थिती दिसून येते. कॉफी पेयापेक्षा अधिक आहे, ही भावनिक अँकर आहे, जी माझ्या जीवनामध्ये संतुलन राखण्यास मदत करते.” शुभांगी अत्रे म्हणाल्या, ”कॉफी मूड उत्साहित करते आणि बदलते ऋतू, हवामान व दैनंदिन मागण्यांनुसार उत्साहपूर्ण अनुभव देते. पावसाळ्यात सकाळच्या वेळी मी आरामदायीपणासाठी वेल्वेटी मोचाचा आस्वाद घेते. उन्हाळ्यामध्ये मी रिफ्रेशिंग आइस्ड ब्रूला प्राधान्य देते, ज्यामुळे दिवसभर उत्साहित राहता येते. कामाच्या दरम्यान इस्प्रेसोचा आस्वाद घेतल्याने मला अवधान केंद्रित करण्यास मदत होते. कॉफीच्या प्रत्येक सिपमधून माझा मूड उत्साहित होतो आणि आसपासचे वातावरण उत्साहपूर्ण असल्यासारखे वाटते. शेवटी, कॉफीसोबत माझ्या बदलत्या स्वभावाशी जुळून जाणारे परिपूर्ण मिश्रण मिळणे महत्त्वाचे आहे.”