no images were found
दूरशिक्षणच्या नवीन चार अभ्यासकेंद्राना प्रशासकीय मान्यता
कोल्हापूर : दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याने शिवाजी विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयामध्ये यंदा चार अभ्यास केंद्राचा समावेश केला आहे. यात कोल्हापूर दोन,सांगली व सातारा प्रत्येकी एक अभ्यासकेंद्राचा समावेश आहे.या अभ्यासकेंद्रांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याने केंद्रांची संख्या ८६ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंद्राबाई शांताप्पा शेंडूरे हुपरी, सिंधु सिनिअर कॉलेज,गांधीनगर, सांगली जिल्ह्यातील ईश्वरराव मोरे-पाटील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय दिघंची ता.आटपाडी, तसेच सातारा जिल्ह्यातील महिला महाविद्यालय,कराड यांचा समावेश आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापि प्रवेश घेतलेला नाही.तसेच ज्यांना नोकरी व्यवसाय सांभाळून अपूर्ण शिक्षण पूर्ण करावयाचे आहे. अशांनी बी.ए.,बी.कॉम.,एम.ए.,एम.कॉम.,एम.एस्सी.गणित., एम.बी.ए.(डिस्टन्स आणि ऑनलाईन) या अभ्यासक्रमांना आपला प्रवेश निश्चित करावा. असे आवाहन संचालक
प्रा.डॉ.डी.के.मोरे यांनी केले आहे.