
no images were found
न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थिनींची सिद्धगिरी रिसर्च सेंटरला भेट
कोल्हापूर (प्रतिनिधी): येथील न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी कणेरीमठ येथील सिद्धगिरी रिसर्च सेंटर व हॉस्पिटलला भेट देऊन रुग्णालयात कशा पद्धतीने काम केले जाते याबाबत माहिती जाणून घेतली.
पुस्तकी ज्ञानासोबत विद्यार्थ्यांना रुग्णालयातील कामकाजाविषयी ज्ञान मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. डी फार्मसी च्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी हे रोजगाराच्या दृष्टीने ग्रामीण रुग्णालयात, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय, खाजगी रुग्णालयात औषधनिर्माण अधिकारी( फार्मासिस्ट) म्हणून कार्यरत होतात. त्यावेळी त्यांना अडचणी यायला नको व काम कसे करावे तसेच विभाग निहाय कामाचे स्वरूप कसे असते आधी विषयांना लक्षात घेऊन कणेरीमठ येथील सिद्धगिरी रिसर्च सेंटरला भेट दिली. रुग्णालयाचे डॉ.ऋतुराज भोसले यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. रुग्णालयातील विभागानुसार सर्व विभागांची माहिती जाणून घेतली. या उपक्रमासाठी कॉलेजचे प्राचार्य रविंद्र कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. उपक्रम यशस्वी होण्यासाठी समन्वयक प्रा. वैष्णवी निवेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी प्रा. पियुषा नेजदार, प्रा.दिव्या शिर्के सर्व शिक्षक, शिक्षकेत्त्तर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.